Home /News /technology /

Hyundaiच्या नव्या Elite i20 मॉडेलचे फोटो लीक; भारतात उत्पादनाला सुरुवात

Hyundaiच्या नव्या Elite i20 मॉडेलचे फोटो लीक; भारतात उत्पादनाला सुरुवात

साधारणपणे पुढच्या महिन्यात ही गाडी भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. चेन्नईमधील कारखान्यात हे फोटो काढण्यात आले असून, यावरून भारतात याचं उत्पादन सुरु झालं असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

  नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : दक्षिण कोरियाची कार निर्मिती करणारी कंपनी Hyundaiच्या नवीन Hyundai Elite i20 गाडीचे फोटो लीक झाले आहेत. भारतात ही गाडी लाँच व्हायच्या आधीच हे फोटो लीक झाले आहेत. साधारणपणे पुढच्या महिन्यात ही गाडी भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. चेन्नईमधील कारखान्यात हे फोटो काढण्यात आले असून, यावरून भारतात याचं उत्पादन सुरु झालं असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या वर्षी मार्च महिन्यात जीनिव्हा मोटर शोमध्ये (Geneva Motor Show) या गाडीचं अनावरण होणार होतं. पण कोरोना संकटामुळे ते पुढं ढकलण्यात आलं आहे. Hyundai Elite i20 गाडीची लांबी आणि रुंदी i30 या व्हेरिएन्टप्रमाणे ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर या फोटोंमध्ये दिसत असल्याप्रमाणे Elite i20 ला पुढील बाजूस Vernaप्रमाणे लूक देण्यात आला आहे. या कारला स्पोर्टी लूक देण्यात आला असून फेब्रुवारीमध्ये याच डिझाईनं स्केच रिलीज करण्यात आलं होतं. यामध्ये नवीन अलॉय व्हिल्स देण्यात आली असून, अँग्युलर हेडलाइड देण्यात आले आहेत. तसंच खिडक्यांमध्ये बदल करण्यात आले नसून Ford Fiesta आणि Audi A1 प्रमाणे खिडक्या देण्यात आल्या आहेत.

  (वाचा - 4 लाखांहून कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता या जबरदस्त कार; मायलेज जास्त आणि किंमत कमी)

  या गाडीमध्ये दोन प्रकारचं इंजिन देण्यात आलं आहे. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन. तसंच 1.0 लिटरचे तीन सिलिंडर असणारे पेट्रोल इंजिन असे पर्याय देण्यात आले आहेत.

  (वाचा - आधी मास्कवाला सेल्फी पाठवा; तरच बुक केलेली कॅब तुमच्या दारात येणार)

  दरम्यान, किमतीचा विचार केला तर या नवीन गाडीची किंमत (एक्स-शोरूम) अंदाजे 6 ते 10 लाख रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. ही मारुती सुझुकी बलेनो Maruti Suzuki Baleno, टाटा अल्ट्रोज Tata Altroz, टोयोटा ग्लांझा Toyota Glanza आणि होंडा जॅझ Honda Jazz या गाड्यांना Hyundai Elite i20 बाजारात चांगली प्रतिस्पर्धी ठरू शकते.

  (वाचा - NASA: आता चंद्रावरही 4G नेटवर्क; मिळणार हायस्पीड इंटरनेट)

  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या