Alert! 'या' स्मार्टफोनमध्ये बंद होऊ शतकं WhatsApp, जाणून घ्या काय आहे कारण

Alert! 'या' स्मार्टफोनमध्ये बंद होऊ शतकं WhatsApp, जाणून घ्या काय आहे कारण

फेसबुकच्या (Facebook) मालकीचं मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आता काही स्मार्टफोनसाठी सपोर्ट बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मार्च : फेसबुकच्या (Facebook) मालकीचं मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आता काही स्मार्टफोनसाठी सपोर्ट बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप बीटा 2.21.50 वर्जन iOS 9 आणि त्याआधीच्या सपोर्ट करणाऱ्या डिव्हाईसला आता व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपने अद्याप याबाबतचं FAQ पेज अपडेट केलं नाही. परंतु iPhone 4 आणि iPhone 4s फोनवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही.

सध्या आयफोनमध्ये iPhone 5 सर्वात शेवटचा फोन आहे, ज्यावर व्हॉट्सअ‍ॅप सुरू आहे. कारण iPhone 5 ला 10.3 पर्यंतचं अपडेट मिळालं आहे. अँड्रॉईड युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप वर्जन 4.0.3 आणि त्यावरील अँड्रॉईडवर चालणाऱ्या स्मार्टफोनला व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करतं.

iOS आणि अँड्रॉईडव्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅप KaiOS वरही काम करतं, जो जिओ फोन आणि जिओ फोन 2 सारख्या फीचर फोनवरही काम करतं.

(वाचा - Petrol-Diesel च्या वाढत्या किंमतीवर लगाम लागणार; सरकारचा मोठा प्लॅन)

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच आर्काइव चॅट्सचं वर्जन येणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितनुसार, सध्या हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. हे फीचर ऑप्शनल असल्याची माहिती मिळत आहे. तसंच व्हॉट्सअ‍ॅपकाही UI अर्थात युजर इंटरफेसवरही काम करत आहे.

(वाचा - Women’s Day 2021:Facebookसाठी वापरा या सेफ्टी टिप्स,असं करा आपलं अकाउंट सुरक्षित)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपकडून एक महत्त्वाचा मेसेज पाठवला जात आहे. या मेसेजला रिमाइंडरही म्हटलं जात आहे. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, आणि या रिमाइंडरकडे तुमचं लक्ष गेलं नसेल, तर येणाऱ्या काही दिवसांत म्हणजेच 15 मेपासून WhatsApp वापरता येणार नसल्याची शक्यता आहे. आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीअंतर्गत WhatsApp ने आपल्या युजर्सला नोटिफिकेशन पाठवण्यास सुरुवात केली आहे. हे नोटिफिकेशन स्वीकारणं युजर्ससाठी अनिवार्य असेल. तरच भविष्यात युजर्स व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकतील.

(वाचा - गाडीला FASTag नसेल,तर वाहनाचा इन्शोरन्सही होणार नाही,लागू होणार ही नवी व्यवस्था)

मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp ने 15 मेपर्यंत प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याची मुदत ठेवली आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्समध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये, यासाठी पॉलिसीबाबत अनेक गोष्टींची माहिती देत आहे. परंतु युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही, तर सुरुवातीला काही दिवस युजर्स केवळ WhatsApp Call आणि नोटिफिकेशन पाहू शकतील. परंतु युजर्स कोणालाही मेसेज करू शकणार नाहीत, तसंच आलेले मेसेज वाचूही शकणार नाहीत.

Published by: Karishma Bhurke
First published: March 9, 2021, 3:26 PM IST

ताज्या बातम्या