CamScanner मध्ये आला धोकादायक व्हायरस; तुमच्या मोबाईलवरून तातडीने करा Delete

Google Play Store मध्ये असलेलं CamScanner App आता धोक्यात आलं आहे. हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमची बँक डिटेल्ससुद्धा यातून चोरी होऊ शकता.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 05:47 PM IST

CamScanner मध्ये आला धोकादायक व्हायरस; तुमच्या मोबाईलवरून तातडीने करा Delete

मुंबई, 28 ऑगस्ट : गूगल प्ले स्टोअरमध्ये दररोज फेक अॅप्स येत आहेत आणि काही लोकप्रिय मोबाईल अॅप्लिकेशन्समध्ये मालवेअर सापडल्याच्या बातम्याही येत आहेत. Google Play Store मध्ये असलेलं CamScanner App आता धोक्यात आलं आहे. हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर वेळीच सावध व्हा. कारण या कॅमस्कॅनर अॅपमध्ये मालवेअर सापडलं आहे. याबद्दल सायबर सिक्युरिटी कॅस्परस्कीने Kaspersky आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये कॅमस्कॅनर अॅप वापरण्याबद्दल इशारा दिला आहे.

CamScanner App हे लोकप्रिय अॅप्लिकेशन अनेकांच्या मोबाईलमध्ये असतं. कुठल्याही डॉक्युमेंटचा चटकन फोटो काढून ते स्कॅन केलं जातं आणि त्याचं pdf आणि jpeg व्हर्जनही लगेच उपलब्ध करून दिलं जातं. अनेक जण आपली कागदपत्र स्कॅन करण्यासाठी सहज सोपा पर्याय म्हणून कॅमस्कॅनर अॅपचा वापर करतात.

हे वाचा - तुमचाही मोबाईल धोकादायक यादीत आहे का? हे नक्की वाचा

मालवेअरचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते, CamScanner App च्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये मलेशियस मोड्युल Trojan Dropper आहे. डिलिव्हरी मेकॅनिझमसारखं हे मालवेअर काम करतं. म्हणजे यूजर्सच्या नकळत हे अॅप अपडेट होतं आणि युजरच्या नकळतच इतर काही अॅड्सवर क्लिक केलं जातं.

Loading...

अँड्रॉइड, विंडोज आणि ioS या तिन्ही ऑपरेटिंग सिस्टीम्समध्ये हे अॅप्लिकेशन आहे. त्यामुळे ते फोनमधून तातडीने डीलिट करणं हाच पर्याय आहे.

PHOTO : या एअरलाइन्समध्ये बिकिनी घालायच्या एअर होस्टेस

हे मालवेअर एकदा डाउनलोड झालं की, बँकिंग डिटेल्स चोरले जाऊ शकतात. बऱ्याचदा फेक सबस्क्रिप्शनसाठी साइन अप केलं जातं आणि अॅड्सवरसुद्धा आपोआप क्लिक केलं जातं. या सगळ्याचा युजरला पत्तासुद्धा लागत नाही.

हे ही वाचा - दीड जीबी पुरत नाही तर 96 रुपयांमध्ये मिळवा दररोज 10 जीबी डेटा, जाणून घ्या ऑफर

CamScanner ने लेटेस्ट व्हर्जनमध्ये हे मालवेअर काढून टाकलं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. पण अनेकांच्या मोबाईलमध्ये जुनं किंवा सदोष व्हर्जन असू शकतं आणि ते त्यांच्याही नकळत डाउनलोड झालेलं असू शकतं.

Trojan.Dropper.AndroidOS.Necro.n हे मलॅशियस मोड्यूल कॅमस्कॅनरमध्ये आढळून आलं आहे. त्यामुळे तुमच्या फोनमधली माहिती धोक्यात आहे. अॅप स्टोअरमध्ये हे फ्री अॅप आहे. सुमारे 10 कोटी लोकांनी हे अॅप डाउनलोड केलेलं आहे. संभाव्य धोका टाळायचा असेल तर तातडीने हे अॅप फोनमधून डीलिट करणं हाच पर्याय आहे.

-----------------------------------------------------------------------

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 05:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...