मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! स्मार्टफोन अपडेट करण्यापूर्वी सावधान; चोरी होऊ शकतो संपूर्ण डेटा

Alert! स्मार्टफोन अपडेट करण्यापूर्वी सावधान; चोरी होऊ शकतो संपूर्ण डेटा

हा मालवेअर एक सिस्टम अपडेट अ‍ॅप्लिकेशनच्या रुपात लपलेला आहे, त्यामुळेच त्याची ओळख होणं कठिण आहे. हे सिस्टम अपडेट एकदा फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर, हा व्हायरस अँड्रॉईड फोन आपल्या कंट्रोलमध्ये घेतो.

नवी दिल्ली, 29 मार्च : जर तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन युजर आहात, तर तुमचा फोन अपडेट करताना सावध राहा. सिस्टम अपडेट करण्यावेळी फोनमध्ये व्हायरस येण्याचा धोका आहे. सिक्योरिटी रिसर्चर्सने एका नव्या आणि धोकादायक मालवेअरची माहिती दिली असून हा मालवेअर अँड्रॉईड युजर्सला टार्गेट करत आहे.

डेटा चोरी होण्याचा धोका -

रिपोर्टनुसार, सर्वात महत्त्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे हा मालवेअर एक सिस्टम अपडेट अ‍ॅप्लिकेशनच्या रुपात लपलेला आहे, त्यामुळेच त्याची ओळख होणं कठिण आहे. हे सिस्टम अपडेट एकदा फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर, हा व्हायरस अँड्रॉईड फोन आपल्या कंट्रोलमध्ये घेतो. एवढंच नाही, तर युजर्सचा डेटा, मेसेजेस आणि फोटोही चोरी होण्याची शक्यता आहे.

(वाचा - Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर असा करा अपडेट; जाणून घ्या सोप्या टीप्स)

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा फोनमध्ये हा मालवेअर आल्यानंतर हॅकर्स ऑडिओ आणि फोन कॉल रेकॉर्ड करू शकतात, फोटो काढू शकतात, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचू शकतात, मेसेज चोरी करू शकतात. तसंच डिफॉल्ट ब्राउजरचे बुकमार्क आणि सर्चही पाहू शकतात. फोनमधील फाईल्स, कॉन्टॅक्ट नंबर्स, नोटिफिकेशन्स, फोनमध्ये असलेले इन्स्टॉल अ‍ॅप्स पाहू शकतात. फोटो, व्हिडीओ चोरी करू शकतात. तसंच जीपीएस लोकेशनही ट्रॅक करू शकतात.

(वाचा - Google Map वर असं अ‍ॅड करा तुमचं शॉप; जाणून घ्या प्रोसेस)

यापासून कसा बचाव कराल -

सिस्टम अपडेट नावाचं हे बनावट अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध नाही. म्हणजेच जर फोन अपडेट करण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोरच्या एखाद्या अ‍ॅपचा वापर करत असाल, तर घाबरण्याची गरज नाही. तसंच नेहमी फोन अपडेट करताना, फोनमध्ये दिलेल्या सिस्टम अपडेट सेटिंग्जमध्ये जाऊनच स्मार्टफोन अपडेट करा. सिस्टम अपडेटसाठी कोणत्याही बाहेरच्या, थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर करू नका.

First published:

Tags: Android, Smartphone