Home /News /technology /

सावधान! तुमचं Google Chrome धोक्यात तर नाही ना? त्वरीत अपडेट करा ब्राउझर, नाहीतर…

सावधान! तुमचं Google Chrome धोक्यात तर नाही ना? त्वरीत अपडेट करा ब्राउझर, नाहीतर…

सावधान! तुमचं Google Chrome धोक्यात तर नाही ना? त्वरीत अपडेट करा तुमचा ब्राउझर, नाहीतर…

सावधान! तुमचं Google Chrome धोक्यात तर नाही ना? त्वरीत अपडेट करा तुमचा ब्राउझर, नाहीतर…

Google Chrome Alert: सध्याचं जग हे इंटरनेटचं जग आहे. इंटरनेटच्या या जगात फसवणुकीचे प्रमाण सातत्याने वाढत असून आता आणखी एका नव्या धोक्याची माहिती समोर आली आहे. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) एजन्सीने गुगल क्रोमबाबत एक अलर्ट जारी केला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 जून :  सध्याचं जग हे इंटरनेटचं जग आहे. इंटरनेटच्या या जगात फसवणुकीचे प्रमाण सातत्याने वाढत असून आता आणखी एका नव्या धोक्याची माहिती समोर आली आहे. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) एजन्सीने गुगल क्रोमबाबत एक अलर्ट (Google Chrome Alert) जारी केला आहे. CERT-In ने लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सध्याचे Google Chrome ताबडतोब अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. गुगल क्रोमने दोन दिवसांपूर्वी आपली नवीन आवृत्ती 103.0.5060.53 लाँच केली आहे. या व्हर्जनमध्ये जुन्या सुरक्षा त्रुटी दूर करण्यासोबतच अनेक नवीन फिचर्सही देण्यात आली आहेत. CERT-In ही इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे. ही संस्था सायबर सुरक्षेशी संबंधित बाबी पाहते. CERT-In ने अहवाल दिला आहे की Google Chrome च्या जुन्या आवृत्तीमध्ये 9 प्रकारच्या सुरक्षा त्रुटी सापडल्या गेल्या आहेत आणि हॅकर तुमच्या सिस्टमला लक्ष्य करण्यासाठी यापैकी कोणताही वापर करू शकतात. हेही वाचा- Oh no! आता गाडीवर बंधनकारक असलेला FASTag ही सुरक्षित नाही? कशी होतेय चोरी पाहा VIDEO CERT-In म्हटले आहे की, Google Chrome मध्ये काही सुरक्षा त्रुटी होत्या. या त्रुटींमुळे वापरकर्ते सायबर हल्ल्यांना बळी पडू शकतात. हे टाळण्यासाठी त्यांनी क्रोमची नवीन आवृत्ती त्वरित डाउनलोड करावी. तुम्हीही क्रोमची जुनी आवृत्ती वापरत असाल, तर तुम्ही अशा प्रकारे गुगल क्रोमची नवीन आवृत्ती डाउनलोड किंवा अपडेट करू शकता-
  • स्टेप 1- संगणक किंवा लॅपटॉपमध्ये Google Chrome उघडा.
  • स्टेप 2- यानंतर, आता तुम्हाला वर उजवीकडे तीन ठिपके दिसतील, ज्यावर क्लिक केल्यावर एक नवीन मेनू उघडेल.
  • स्टेप 3- आता 'सेटिंग्ज' वर क्लिक करा आणि नंतर ‘About Chrome’ निवडा.
  हेही वाचा- Facebook-Instagram यूजर्सवर पडेल पैशांचा पाऊस; स्वतः झुकरबर्ग यांनी सांगितली भन्नाट आयडिया
  • स्टेप 4- यानंतर तुम्हाला तुमच्या ब्राउझरची सध्याची आवृत्ती दिसेल आणि नवीन आवृत्ती (Latest Version) स्थापित होईल.
  • स्टेप 5- इंस्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर ' Relaunch' नावाचे एक बटण दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • स्टेप 6- यावर क्लिक केल्यावर, Google Chrome ब्राउझर बंद होईल आणि पुन्हा उघडेल. अशा प्रकारे अद्यतन प्रक्रिया पूर्ण होईल.
  Published by:Suraj Sakunde
  First published:

  Tags: Google, Technology

  पुढील बातम्या