Home /News /technology /

Alert!एक क्लिक आणि 21000 कोटींचं नुकसान, या Apps चा वापर करणं धोकादायक ठरू शकतं

Alert!एक क्लिक आणि 21000 कोटींचं नुकसान, या Apps चा वापर करणं धोकादायक ठरू शकतं

कोरोना काळात पैशाच्या कमीमुळे अनेक जण पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत आणि अनेक जण सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकत आहेत. देशात होणाऱ्या सायबर फ्रॉडमागे चिनी अ‍ॅप्सही असल्याचं बोललं जात आहे.

  नवी दिल्ली, 16 जानेवारी : जगभरात कोरोना व्हायरसमुळे (Corona Pandemic) अनेकांना आर्थिकदृष्ट्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अनेकांची नोकरी गेली, तर अनेक व्यवसायही ठप्प झाले. याचदरम्यान, पैशाच्या कमीमुळे अनेक जण पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. परंतु अशा काळात सावध राहण्याची गरज आहे. अनेक जण सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकत आहेत. देशात होणाऱ्या सायबर फ्रॉडमागे चिनी अ‍ॅप्सही असल्याचं बोललं जात आहे. अनेक भारतीय युजर्स Instant Loan App चा वापर करत आहेत. अधिकतर Instant Loan App चीनमधून ऑपरेडेट असतात. हे अ‍ॅप्स युजर्सला केवळ एका क्लिकवर इन्स्टंट लोन देण्याचा दावा करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चायनीज इन्स्टंट लोन अ‍ॅप्स एका क्लिकवर लोन देण्याचा दावा करतात आणि त्यावेळी इंटरेस्ट रेटचा खुलासा करत नाहीत. अधिकाऱ्यांनुसार, प्रोसेसिंग फीस, जीएसटी आणि इतर काही गोष्टी जोडून प्रत्येक आठवड्याला 30 टक्क्यांपर्यंत व्याज वसूल करतात.

  (वाचा - सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय का? गृह मंत्रालयाकडून फसवणुकीबाबत अलर्ट जारी)

  आतापर्यंत पोलिसांना 1000 कोटी रुपयांचं डिस्बर्समेंट आढळलं आहेत. हैदराबाद पोलिसांना 21 हजार कोटी रुपयांचं ट्रान्झेक्शन चार वेगवेगळ्या चिनी कंपन्यांमध्ये आढळलं आहे. यात काही ट्रान्झेक्शन बिटकॉईनद्वारे झाले आहेत आणि त्यांना रेफरेन्सने परदेशात पाठवण्यात आलं आहे. काही प्रकरणात पोलिसांनी 110 कोटी रुपये सीज केले आहेत. तर दुसरीकडे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Instant Loan App च्या जाळ्यात अडकलेल्या अनेक लोकांनी आत्महत्या केली आहे. पोलीस या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहेत.

  (वाचा - Google ची मोठी कारवाई; Play Store वरुन हटवले शेकटो बनावट पर्सनल लोन Apps)

  दरम्यान, गुगलने (Google) प्ले स्टोअरवर (Play Store) धोकादायक वित्तीय सेवा देणाऱ्या, पर्सनल लोन देणाऱ्या अ‍ॅपचा आढावा घेतला. त्यात अनेक अ‍ॅप्स नियमांचं, धोरणांचं उल्लंघन करत असल्याचं आढळून आलं. अ‍ॅपच्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन करत असणाऱ्या सर्व अ‍ॅप्सना Google Play Store वरुन काढून टाकण्यात आलं आहे. तसंच इतर अ‍ॅप्सच्या डेव्हलपर्सना, भारतात लागू असलेल्या कायद्यांचं आणि नियमांचं ते पालन करतात, हे दाखवण्यास सांगितलं आहे. तसंच, हे दर्शवण्यात अयशस्वी ठरलेल्या अ‍ॅप्सना पुढील कोणतीही सूचना न देता काढून टाकण्यात येईल असा इशाराही गुगलने दिला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime

  पुढील बातम्या