598 रुपयांमध्ये Jio की Airtel कोणता प्लॅन आहे सर्वात बेस्ट?

598 रुपयांमध्ये Jio की Airtel कोणता प्लॅन आहे सर्वात बेस्ट?

आता वोडाफोन-आयडिया कंपनीला टक्कर देण्यासाठी जिओ आणि एअरटेल दोन्ही कंपन्या कंबर कसून स्पर्धेत उतरले आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर: बऱ्याचवेळा आपल्याकडे दोन सिमकार्ड असतात किंवा आपण नवीन सिमकार्ड घेताना कोणती कंपनी आपल्याला कमी प्लॅनमध्ये जास्त फायदा देईल याची चाचपणी करतो. आता वोडाफोन-आयडिया कंपनीला टक्कर देण्यासाठी जिओ आणि एअरटेल दोन्ही कंपन्या कंबर कसून स्पर्धेत उतरले आहेत. यामध्ये एअरटेल आणि जिओ दोन्ही कंपन्यांनी स्पर्धेत एकमेकांना तोडीस तोड प्लॅन आणले असल्यानं बऱ्याचदा ग्राहकांना कोणता उत्तम प्लॅन हे निवडणं कठीण जातं.

यासाठी आज आम्ही तुमची मदत करणार आहोत. जिओ आणि एअरटेल कंपनीने 349, 444 आणि असे अनेक प्लॅन एकसारखे आणले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ग्राहकांना दिल्या जात असतानाच आता चर्चा आहे ती दोन्ही कंपन्यांकडून दिला जाणाऱ्या 598 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना काय फायदा मिळणार आहे जाणून घेऊया.

हे वाचा-Paytm युजर्सना मोठा झटका, प्ले स्टोअरवरून अ‍ॅप झालं गायब

तुम्ही जिओचे ग्राहक असाल आणि 598 रुपायांचा jio चा प्लॅन तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 56 दिवसांच्या वैधतेसह 112 GB डेटा मिळणार आहे. दरदिवशी 2GB डेटासह 100 SMS आणि इतर नेटवर्कसाठी 2000 मिनिटं मिळणार आहेत. याशिवाय जिओ ते जिओ फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना जिओ अॅप्सचं फ्री सबस्क्रिप्शनदेखील मिळणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात ग्राहकांना Disney Hotstar VIP वर्षभरासाठी मोफत मिळणार आहे.

हे वाचा-सावधान! देशामध्ये डिजिटल हेरगिरी वाढतेय, जाणून घ्या काय घ्याल खबरदारी

तुम्ही जर airtel चे ग्राहक असाल आणि 598 रुपयांचा प्लॅन निवडणार असाल तर एअरटेलच्या या योजनेत ग्राहकांना दररोज 1.5 GB डेटा दिला जातो. याव्यतिरिक्त या योजनेत ग्राहकांना 6 जीबी अतिरिक्त डेटाही देण्यात आला आहे. हा प्लॅन 84 दिवसांसाठी असणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS मिळणार आहेत. याशिवाय एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम आणि विंक म्युझिक अॅपचे सबस्क्रिप्शनही देण्यात आले आहे. याशिवाय एफएस्टागवर अमर्यादित विनामूल्य हेलोट्यून आणि 150 रुपये कॅशबॅक देखील देण्यात आला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 18, 2020, 2:50 PM IST
Tags: AirtelJIO

ताज्या बातम्या