Airtel, Vodafone-Idea नंबर सुरू ठेवण्यासाठी 'हा' रिचार्ज करावाच लागणार

Airtel, Vodafone-Idea नंबर सुरू ठेवण्यासाठी 'हा' रिचार्ज करावाच लागणार

प्रीपेड प्लॅन महागडे केले असतानाही कंपन्यांकडून मिनिमम रिचार्ज पॉलिसी बंद करण्यात आलेली नाही.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : टेलिकम्युनिकेशन कंपन्यांनी डिसेंबर महिन्यापासून रिचार्जचे दर वाढवले आहेत. एअरटेल, व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी कंपन्यांनी इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी लागणाऱे शुल्क आकारले जाणार नसल्याचं जाहीर केलं. मात्र, जिओने इतर नेटवर्कसाठी 6 पैसे प्रतिमिनिट दर आकारला आहे. दरम्यान, एइरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी असली तरी दुसरी बातमी मात्र खिशाला कात्री लावणारीच आहे. प्रीपेड प्लॅन महागडे केले असतानाही कंपन्यांकडून मिनिमम रिचार्ज पॉलिसी बंद करण्यात आलेली नाही.

तुमचा मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी दर महिन्याला ठराविक रकमेचा रिचार्ज करणे आवश्यक केलं आहे. एअरटेलने 23 तर व्होडाफोन-आयडियाने 24 रुपये कमीत कमी रिचार्ज करावा लागेल. कारण कंपन्यांनी 20, 30 रुपयांचे टॉक टाइम प्लॅन रिलाँच केले आहेत.

रिचार्जची मुदत संपल्यानंतर तुमचे आऊट गोइंग कॉल्स त्याच वेळी बंद होतात. तर 7 दिवसांच्या आत रिचार्ज केला नाही तर इनकमिंग कॉल्स बंद होतील. याआधी इनकमिंग कॉल्स येण्यासाठी रिचार्ज असणं आवश्यक नव्हतं. आता एअरटेलचा मिनिमम प्लॅन 23 रुपयांचा तर आयडियाचा 24 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना कोणताही डेटा, टॉक टाइम किंवा एसएमएस मिळत नाही. हे प्लॅन फक्त प्रीपेड अकाउंटची मुदत वाढवण्यासाठी आहेत. एअरटेलच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांसाठी तर व्होडाफोन-आयडियाने 14 दिवसांसाठी वैधता दिली आहे.

Published by: Suraj Yadav
First published: December 13, 2019, 9:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading