नेटवर्क नसतानाही करा कॉल, द्यावे लागणार नाहीत पैसे

नेटवर्क नसतानाही करा कॉल, द्यावे लागणार नाहीत पैसे

कॉलिंग व्हॉटसअॅप, मेसेंजरप्रमाणे कॉलिंग होते. यामध्ये कोणत्याही वेगळ्या अॅपची गरज पडत नाही.

  • Share this:

मुंबई: मोबाईलवर नेटवर्क नसलं की आपण जगाशी कनेक्टच नाही असं वाटतं. आता भारतात अशी सेवा सुरू होणार आहे ज्यामुळे युजर्सना वायफायच्या मदतीने कॉल करता येईल. सध्या एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी ही खूशखबर आणली आहे. त्यांना सेल्युलर नेटवर्क शिवाय कॉल करता येईल. ET टेलिकॉमने दिलेल्या माहितीनुसार एअरटेलने भारतात वेगवेगळ्या लोकेशनवर Voice over Wi Fi (VoWo-Fi)ची चाचणी सुरू केली आहे. यामध्ये युजर्सना फोनमध्ये सेल्युलर नेटवर्क नसल्यास कॉल करता येईल. रिपोर्टनुसार डिसेंबरमध्ये ही सेवा एअरटेल सुरू करण्याची शक्यता आहे.

एअरटेलने याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्याकडून अनेक लोकेशनवर VoWi-Fi चाचणी सुरु केली जात आहे. लवकरच ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. टाइम्सच्या रिपोर्टनुसार Airtel ची VoWi-Fi सेवा सध्या Samsung Galaxy Note 10 सारख्या फोनसाठी उपलब्ध आहे.

VoWi-Fi तुमच्या फोनमध्ये सुरु करण्यासाठी कॉल सेटिंग मेन्यूमध्ये जा. तिथं पर्यायामध्ये वायफाय कॉलिगं पर्याय असेल तो ऑन करा. त्यानंतर तुमचं सेल्युलर नेटवर्क म्हणजे फोनचं नेटवर्क स्लो असेल किंवा नसेल तर वायफाय अॅक्टिवेट होईल. यासाठी जवळपास वायफाय नेटवर्क अॅक्टिव असणं गरजेचं आहे.

सेल्युलर नेटवर्क नसताना VoWi-Fi कॉलिंग व्हॉटसअॅप, मेसेंजरप्रमाणे कॉलिंग होते. यामध्ये कोणत्याही वेगळ्या अॅपची गरज पडत नाही. युजर्सना इनबिल्ट सुविधा मिळते. VoWi-Fi कॉलसाठी अतिरिक्त शुल्कही द्यावे लागत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2019 07:22 AM IST

ताज्या बातम्या