नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : एअरटेलने (Bharti Airtel)आपल्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर सुरू केली आहे. ‘New 4G SIM किंवा 4G Upgrade Free Data Coupons अशी ही ऑफर आहे. या ऑफरद्वारे कंपनी आपल्या नव्या 4G ग्राहकांना 5GB डेटा फ्रीमध्ये देत आहे. टेलिकॉम कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवे एअरटेल ग्राहक या 5GB डेटाचा वापर 1GB पाच कूपनच्या रुपात करू शकतील. त्यासाठी ग्राहकांना सर्वात आधी एअरटेल थँक्स ऍप डाउनलोड करावं लागेल.
एअरटेल त्या ग्राहकांना 5GB डेटा फ्री देत आहे, ज्यांनी नवं 4G सिम खरेदी केलं आहे किंवा 4G डिव्हाईसवर अपग्रेड केलं आहे. किंवा पहिल्यांदा प्रीपेड मोबाईल नंबरचा वापर करून Airtel Thanks app साठी रजिस्टर केलं आहे.
(वाचा -
हौसेला मोल नाही! 39.50 लाखाच्या कारसाठी 34 लाख रुपयांचा VIP रजिस्ट्रेशन नंबर)
असा मिळेल फ्री डेटा -
- या ऑफरचा फायदा घेण्यासाठी एअरटेल प्रीपेड 4G सब्सक्रायबरला गुगल प्ले स्टोरवरून Airtel Thanks app चं अपडेटेड वर्जन डाउनलोड करावं लागेल.
- त्यानंतर युजरला मोबाईल नंबर ऍक्टिव्हेट झाल्याच्या 30 दिवसांच्या आत प्रीपेड मोबाईल नंबरद्वारे रजिस्टर करावं लागेल.
कूपनसाठी काय कराल -
एअरटेलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यासाठी क्वालिफॉय झाल्यानंतर जिंकणाऱ्या युजरला कूपन मिळाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर Airtel Thanks app च्या My Coupons सेक्शनमध्ये युजर कूपन क्लेम करू शकतो.
कूपन क्रेडिट झाल्यानंतर, 90 दिवसांच्या आत प्रत्येक 1 GB कूपन रिडीम केलं जाऊ शकतं. हे तीन दिवसापर्यंत वैध असेल आणि तीन दिवसांनंतर त्याची वैधता संपेल.
ही ऑफर लागू करून घेण्यासाठी काही अटी-शर्ती आहेत. या ऑफरचा फायदा एक युजर केवळ एका मोबाईल नंबरचा वापर करून, एक वेळच मिळवू शकतो. युजर 5GB फ्री डेटा मिळवण्यासाठी पात्र असल्यास, तो आपोआप 2 जीबी फ्री डेटा ऑफरमधून बाहेर होईल.
दरम्यान, सध्या Airtel Thanks app पहिल्यांदा डाउनलोड केल्यावर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर 2GB डेटा फ्री देण्यात येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.