• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Airtel ने केलं क्लाउड गेमिंग 5G नेटवर्कचं टेस्टिंग, मिळाला हैराण करणारा स्पीड

Airtel ने केलं क्लाउड गेमिंग 5G नेटवर्कचं टेस्टिंग, मिळाला हैराण करणारा स्पीड

Airtel ने गेमिंग शोकेससाठी 5G ट्रायल सेशनचं आयोजन केलं होतं. यात Airtel 5G वर क्लाउड गेमिंग किती वेगात होतेय हे दाखवण्यात आलं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : 5G सर्विस सध्या भारतात कमर्शियलरित्या लाँच करण्यात आलेली नाही. टेलिकॉम कंपन्या 5G चं ट्रायल करत आहेत. Airtel ने याबाबत पुन्हा एकदा ट्रायल केलं आहे. Airtel ने गेमिंग शोकेससाठी 5G ट्रायल सेशनचं आयोजन केलं होतं. यात Airtel 5G वर क्लाउड गेमिंग किती वेगात होतेय हे दाखवण्यात आलं. या ट्रायलसाठी Airtel ने Ericsson आणि Nokia सह पार्टनरशिप केली आहे. यात 3500 MHz हाय कॅपेसिटी स्पेक्ट्रम बँडचा वापर करण्यात आला आहे, जो डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमकडून देण्यात आला आहे. Airtel ने गेमर्सला गेमिंग प्लॅटफॉर्म Blacknut साठी इनव्हाईट केलं. गेमर्स OnePlus 9R हँडसेटवर Asphalt खेळले. या ट्रायलसाठी Airtel ने गेमर्सला टेस्ट 5G सिम दिलं होतं. यात 1Gbps पर्यंत नेटवर्क होता. Speedtest Global Index जुलै 2021 च्या रिपोर्टनुसार हा डेटा आहे. या ट्रायलमध्ये एअरटेलने 5G चा वापर करुन क्लाउड गेमिंग कशाप्रकारे होऊ शकतं, याबाबत सांगितलं. यात मोबाईल युजर्स जे गेम्स खेळतात, ते खेळण्याची पद्धतच बदलली जाईल असं सांगण्यात आलं आहे. 5G नेटवर्क रियल टाइम गेमिंगसाठी Blacknut ला सपोर्ट करेल. यामुळे डिव्हाईसवर गेम इन्स्टॉल न करताच खेळला जाऊ शकतो. जानेवारी 2021 मध्ये भारती एअरटेलने (Airtel) हैद्राबाद येथे कर्मशिअल नेटवर्कवर 5Gची तपासणी यशस्वी झाल्याचा दावा केला होता.

  भारतात 5G नेटवर्कच्या ट्रायलला मंजुरी; 'या' कंपन्या करणार टेस्टिंग, चायनीज कंपन्यांना No Entry

  दरम्यान, भारत 5G नेटवर्कच्या स्पर्धेत विकसित देशांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. गेल्यावर्षी नेटवर्क चाचणी पुरवठादार VIAVIच्या आकडेवारीनुसार, 5G नेटवर्क 34 देशांमधील 378 शहरांमध्ये उपलब्ध आहे आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. दक्षिण कोरियाने 85 शहरांमध्ये हे नेटवर्क सुरु केले आहे. चीनमधील 57, युएस मधील 5, युके मधील 31 शहरांमध्ये यापूर्वीच 5G नेटवर्क सेवा सुरू झालेली आहे.
  Published by:Karishma
  First published: