Home /News /technology /

Airtel ग्राहकांसाठी मोठी बातमी, मोफत दिली जाणारी 'ही' सेवा होणार बंद

Airtel ग्राहकांसाठी मोठी बातमी, मोफत दिली जाणारी 'ही' सेवा होणार बंद

jio आणि vodafone कंपनीला टक्कर देण्यासाठी सुरू केलेली सेवा Airtel कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 03 फेब्रुवारी: जिओने आपल्या ग्राहकांसाठी विशेष सेवा आणल्यानंतर टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने खास आपल्या प्लानसोबत वेगवेळ्या सेवा आणल्या होत्या. आता त्यातील काही सेवा कंपनी बंद करण्याच्या तयारीत आहे. एअरटेल कंपनीने आपल्या काही प्लानसोबत नेटफ्लिक्स सेवा फ्री देत होती. आता ही मोफत सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर ब्रॉडबँड आणि पोस्टपेड योजनांचा समावेश आहे. वोडाफोन कंपनीकडून मात्र सध्या तरीही सुविधा सुरू आहे. एअरटेलची ऑफर काय होती भारती एअरटेल काही पोस्टपेड आणि ब्रॉडबँड योजनांसह नेटफ्लिक्सचं 3 महिन्यांचं सबस्क्रिबशन मोफत दिलं जात होतं. आता ही सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. सध्या ज्यांनी हे सबस्क्रिबशन केलं आहे त्यांना 3 महिने या सेवेचा लाभ घेता येणार आहे. मात्र त्यानंतर नेटफ्लिक्ससाठी वेगळे पैसे भरावे लागणार आहेत. एअरटेल कंपनीने केवळ नेटफ्लिक्स सुविधा फ्री देणं बंद केलं आहे. या व्यतिरिक्त मिळणाऱ्या फ्री सेवांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. एअरटेलच्या 499 रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये ग्राहकांना 75 GB डेला, अनलिमिटेड कॉलिंग, free SMS सारख्या सेवांसोबतच अमेझॉन फ्री प्राइम मेंबरशिपसह Zee5 अॅप, Xstream सारख्या अॅपचं सबस्क्रिबशन फ्रीमध्ये मिळणार आहे. एअरटेलनेसुद्धा व्होडाफोनप्रमाणेच 449 रुपयांचा प्लॅन दिला आहे. त्यात मिळणाऱ्या सुविधाही तशाच आहेत. दररोज 2 जीबी डेटा आणि 100 फ्री एसएमएस मिळणार आहेत. कंपनीने यासोबत विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम सर्विसचा अॅक्सेसही मिळतो. हेही वाचा-Jio, Vodafone, airtel चे बेस्ट प्लॅन, 149 रुपयांमध्ये मिळणार 'या' सुविधा हेही वाचा-Airtelचा नवा प्लान, unlimited calling सोबत मिळणार 2 लाखांचा विमा
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Airtel, JIO, Recharge

    पुढील बातम्या