• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Airtel चा 119 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन लाँच, असे मिळतील फायदे

Airtel चा 119 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन लाँच, असे मिळतील फायदे

एअरटेलने (Airtel) एक नवा डेटा अ‍ॅड-ऑन पॅक (Airtel Add on pack) प्रीपेड मोबाईल सब्सक्रायबर्ससाठी लाँच केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : एअरटेलने (Airtel) एक नवा डेटा अ‍ॅड-ऑन पॅक (Airtel Add on pack) प्रीपेड मोबाईल सब्सक्रायबर्ससाठी लाँच केला आहे. याला कंपनीने Xstream मोबाईल पॅक नाव दिलं आहे. याची किंमत 119 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 15GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. याची वॅलिडिटीही आधीच्या चालू प्लॅन इतकीच असेल. अ‍ॅड-ऑन डेटाशिवाय या पॅकमध्ये युजर्सला Airtel Xstream मोबाईल अ‍ॅपमध्ये तीनपैकी एका चॅनलचं 30 दिवसांचं सब्सक्रिप्शन दिलं जातं. Airtel युजर्स या प्लॅनचा अ‍ॅक्सेस Airtel Thanks App किंवा कोणत्याही थर्ड पार्टी रिचार्ज पोर्टलवरुन घेऊ शकतात. युजर्सला Airtel Xstream कंटेंटचा अ‍ॅक्सेस दिला जातो. त्याशिवाय युजर्स ErosNow हिंदी आणि मल्याळम आणि बंगालीपैकी एका OTT चं 30 दिवसांचं सब्सक्रिप्शन घेऊ शकतात.

  Airtel CEO चा इशारा, चुकूनही हे App डाउनलोड करू नका, अन्यथा...

  Airtel Xstream App अँड्रॉईड किंवा iOS वर डाउनलोड करू शकता. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी सब्सक्रायबर्सला Airtel Xstream चं लेटेस्ट वर्जन अपडेट करावं लागेल.

  दिवसभरात Instagram वर किती वेळ घालवला? सोप्या ट्रिकने असं तपासा

  दरम्यान, स्ट्रिमिंग बेनिफिट्समध्ये Airtel Disney+Hotstar प्लॅन्स अपडेट करत आहे. याची किंमत 499 रुपये, 699 रुपये, 2798 रुपये आहे. 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा 28 दिवसांसाठी येतो.

  सावधान! या मेसेजद्वारे Airtel, Jio, Vodafone ग्राहकांची होतेय फसवणूक, असं राहा सुरक्षित

  699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2GB डेटा 56 दिवसांसाठी दिला जातो. तर 2798 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2GB डेटा 365 दिवसांसाठी मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल, 100 SMS तसंच Amazon Prime Video Mobile Edition चंही सब्सक्रिप्शन फ्री दिलं जातं.
  Published by:Karishma
  First published: