Home /News /technology /

Airtelचा नवा प्लान, unlimited calling सोबत मिळणार 2 लाखांचा विमा

Airtelचा नवा प्लान, unlimited calling सोबत मिळणार 2 लाखांचा विमा

जिओ आणि वोडाफोनला टक्कर देण्यासाठी airtelचा नवा प्लान, मिळणार भरपूर फायदा

    मुंबई, 20 जानेवारी: टेलिकॉम सेक्टरची मुख्य कंपनी असलेल्या Bharti Airtel कंपनीने jio आणि vodafoneला टक्कर देण्यासाठी कंपनीने नवीन हटके प्लान आपल्या ग्राहकांना दिला आहे. जिओ आणि वोडाफोन कंपनीने एकमेकांसोबत स्पर्धा करत शंभर रुपयांहून अधिक प्लान लाँच केला आहे. 99 आणि 149 रुपयांच्या प्लानला टक्कर देण्यासाठी खास आता Airtelने नवी सेवा सुरू केली आहे. 179 रुपयांचा प्लान घेतल्यास तुम्हाला 2 लाखांचा विमा मिळणार आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि कसा घेता येणार लाभ वाचा. airtel prepaid 179 plan 179 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 GB डेटा, 300 SMS, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासेबतच आता तुम्हाला (Bharti AXA Life Insurance) भारती एक्सा लाइफ इंश्युरन्स मिळणार आहे. 2 लाख रुपयांचा हा विमा असणार आहे. 18 ते 54 वर्षांचा airtelधारक ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नसल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. विमा प्रमाणपत्र तुम्हाला डिजिटल स्वरुपात त्वरित देण्यात येईल अथवा तुमच्या मेलवर पाठवण्यात येईल. ग्राहकांना याची प्रत अवश्यकता असल्यास उपलब्ध करून दिली जाईल. या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला एअरटेलच्या जवळच्या स्टोरमध्येही मिळू शकते. हेही वाचा-Hyundai Creta दमदार लूकमध्ये लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स Airtel 149 Rupees Plan Airtel च्या ग्राहकांना प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. Airtel ते इतर नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग फ्री असेल. 2 GB डेटा आणि 300 SMS प्रतिदिवशी फ्री मिळणार आहेत. Xstream आणि विंक म्यूजिकसारखे Applicationचं सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. Airtel एअरटेलनेसुद्धा व्होडाफोनप्रमाणेच 449 रुपयांचा प्लॅन दिला आहे. त्यात मिळणाऱ्या सुविधाही तशाच आहेत. दररोज 2 जीबी डेटा आणि 100 फ्री एसएमएस मिळणार आहेत. कंपनीने यासोबत विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम सर्विसचा अॅक्सेसही मिळतो. हेही वाचा-एक लाख रुपयांचा पंखा, महागड्या फॅनमध्ये आहेत खास फीचर्स
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Airtel, Airtel online Store, Airtel plan, JIO, Mobile phone, Techonology, Vodafone, Vodafone idea tariff plan

    पुढील बातम्या