मोबाईलवर बोलणं महागणार,आजपासून रिचार्ज प्लॅन वाढणार?

मोबाईलवर बोलणं महागणार,आजपासून रिचार्ज प्लॅन वाढणार?

एक डिसेंबर पासून Vodafone, Idea, Airtel या कंपन्या टेरिफ प्लॅन वाढवण्याची तयारी करत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली,1 डिसेंबर: टेलिकम्युनिकेशन कंपन्यांच्या स्पर्धेत ग्राहकांना स्वस्तात अनेक सेवा गेल्या काही वर्षांमध्ये मिळाल्या. मात्र डिसेंबर 2019 पासून कॉलिंगसह इतर दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एक डिसेंबर पासून Vodafone, Idea, Airtel या कंपन्या टेरिफ प्लॅन वाढवण्याची तयारी करत आहेत. याआधीच कंपन्यांनी दर वाढवण्याची घोषणा केली होती. टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 14 वर्षे जुन्या अॅडजेस्टेड ग्रास रिव्हेन्यू (एजीआर) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर कंपन्यांवर आर्थिक भार वाढला आहे. यासाठीच कंपन्यांकडून टेरिफ प्लॅन वाढवण्याचा विचार सुरू आहे.

एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया एक डिसेंबर पासून टेरिफ प्लॅन वाढवणार आहेत. अॅडडेस्टेड ग्रॉस रिव्हेन्यूची मोठी थकबाकी भरण्याचे दडपण त्यांच्यावर आहे. दरम्यान, कंपन्यांनी टेरिफ प्लॅन किती महाग होईल याबाबत काही सांगितलेलं नाही. तरीही 35 टक्क्यांपर्यंत दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवाढीबाबत एअरटेलचं म्हणणं आहे की, टेलिकॉम सेक्टरमध्ये नव्या तंत्रज्ञानासाठी गुंतवणुकीची गरज आहे आणि यासाठी टेरिफ प्लॅन वाढवले आहेत.

रिचार्जची किंमत वाढवली नाही तर वॉइस कॉल, एसएमएस किवा डेटा यांचा लाभ कमी दिला जाईल. रिचार्जवर मिळणाऱ्या फायदे कमी मुदतीसाठीही दिले जाण्याची शक्यता आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने टेरिफ प्लॅन एक डिसेंबरपासून वाढवले जातील असं सांगितलं आहे.

First published: December 1, 2019, 10:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading