Airtel SIM अपडेट करा, अन्यथा 'या' सुविधांचा घेता येणार नाही लाभ

Airtel SIM अपडेट करा, अन्यथा 'या' सुविधांचा घेता येणार नाही लाभ

Airtel सिम वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, तुमचं सिम अपडेट आहे का?

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: दूरसंचार कंपनी भारतीय एअरटेल या कंपनीचे तुम्ही ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर तुमचं सिम अपडेट केलं नसेल किंवा तुमचं सिमकार्ड जुनं असेल आणि तुम्ही ते बदलून घेतलं नसेल तर तुमचं इंटरनेट बंद होऊ शकतं. कोलकाता, केरळसोबतच काही सर्कल्समधील 3G सिम बंद करण्याचा निर्णय एअरटेल कंपनीने घेतला आहे. तुमचं जर 3G सिम असेल तर तुमच्या मोबाईलवरील इंटरनेट सुविधा बंद होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. हरियाणामध्ये जुन्या सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसला आहे. कंपनीने इथली इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. देशभऱात 4G नेटवर्कचा अधिक चांगला लाभ घेता यावा आणि सुसूत्रता यावी यासाठी फक्त 4G नेटवर्क असणारे सिमकार्ड वापरले जातील असं कंपनीने सांगितलं आहे. त्यामुळे जुने सिमकार्ड असणाऱ्या ग्राहकांनी त्वरित सिमकार्ड बदलून घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांना इंटरनेट सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

यामुळे ग्राहकांना कोणतही नुकसान होणार नाही. मात्र जुन्या सिमकार्डवर इंटरनेटचा लाभ घेता येणार नाही. यामुळे ग्राहकांना हाय स्पीड नेटवर्क देणं कंपनीला शक्य होईल. संपूर्ण देशभरात आता बाकी 3G, 2G नेटवर्कसाठी वापरली जाणारी सिमकार्ड आणि नेटवर्क बंद करण्याचा निर्णय एअरटेल कंपनीने घेतला आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर सुरुवातील केरळ, हरियाणा आणि कोलकाता इथे 3G नेटवर्क बंद करण्यात आलंय. तिथे फक्त 4G नेटवर्कच्या सुविधेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये कंपनीकडून देशभरात याची अंमलबजावणी करण्यात येऊ शकते.

कंपनीकडून 3G स्पेक्ट्रमला रिफॉर्म करण्यासाठी 4G नेटवर्कमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला. कंपनीकडून ग्राहकांना सगळ्या सर्कलमध्ये 4G VoLTE सुविधेचा लाभ घेता येईल याबाबत काही बदल करत आहे. ET टेलिकॉमकडून मिळलेल्या माहितीनुसार कंपनीने 3G, 2G नेटवर्क संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं त्या दिशेनं प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे 3G नेटवर्क वापरत असलेल्या ग्राहकांनी 4Gमध्ये आपलं सिम कनवर्ट करावं असं आवाहन कंपनीकडून करण्यात येत आहे.

त्यामुळे Airtel नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांचं सिम जुनं असेल तर त्वरित 4G मध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक वेगवान नेटवर्कचा लाभ घेता येईल. जर तुम्ही अपडेट करण्यासाठी आळस केला तर वायरस कॉलिंग, स्पॅमचा त्रास होईलच यासोबत इंटरनेटची सुविधाही मिळणार नाही. याबाबत कंपनीकडून वारंवर ग्राहकांना माहिती दिली जात आहे. सिम अपडेट करण्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 17, 2019, 2:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading