मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Honda फेस्टिव्ह ऑफर्स : 2 व्हीलर्स घेण्यासाठी सुवर्णसंधी; हजारोंची सूट, भरपूर बचत

Honda फेस्टिव्ह ऑफर्स : 2 व्हीलर्स घेण्यासाठी सुवर्णसंधी; हजारोंची सूट, भरपूर बचत

होंडाने आगामी उत्सवाच्या हंगामापूर्वी आपल्या दुचाकी वाहनांवर ‘होंडा सुपर 6’ ऑफर जाहीर केली आहे.

होंडाने आगामी उत्सवाच्या हंगामापूर्वी आपल्या दुचाकी वाहनांवर ‘होंडा सुपर 6’ ऑफर जाहीर केली आहे.

होंडाने आगामी उत्सवाच्या हंगामापूर्वी आपल्या दुचाकी वाहनांवर ‘होंडा सुपर 6’ ऑफर जाहीर केली आहे.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : होंडा 2 व्हीलर्स इंडियाने आगामी उत्सवाच्या हंगामापूर्वी आपल्या दुचाकी वाहनांवर ‘होंडा सुपर 6’ ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरचा भाग म्हणून वाहन उत्पादक कंपनीने 6 ऑफर्स जाहीर केल्या असून, त्यातून ग्राहकांची तब्बल 11,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकेल.

रिटेल फायनान्सवर 11,000 रुपयांपर्यंत बचत :

होंडा ग्राहक आता वाहन मूल्याच्या 100% पर्यंत कर्ज मिळवू शकतात. बचतीमध्ये आणखी भर घालण्यासाठी ते सर्वात कमी व्याज दर देत आहेत. पहिल्या 3 महिन्यांसाठी 7.99% आहे आणि ईएमआयवर सुद्धा 50% सूट मिळणार आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक, एल अँड टी फायनान्शियल सर्व्हिसेस, इंडसइंड बँक, मुथूट कॅपिटल, चोलामंडल फायनान्स, टाटा कॅपिटल टू-व्हीलर लोन यासारख्या होंडाच्या विविध फायनान्स पार्टनरकडून ग्राहक कर्ज घेऊ शकतात.

(वाचा - काय आहे काम? आता फोन उचलण्याआधीच समजणार; Truecallerचं नवं फिचर)

क्रेडिट आणि डेबिट कार्डावर 5,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक :

होंडाने क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरून केलेल्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. यात 5,000 रुपयांपर्यंत बचत होईल. या ऑफरचा फायदा ईएमआयवरील कॅशबॅक मिळवणाऱ्या ग्राहकांना होईल. आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, येस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड आणि फेडरल बँक अशा बँकांच्या क्रेडिट कार्ड ईएमआयवर ही योजना लागू आहे.

(वाचा - Apple watchच्या 'या' फीचरमुळे वाचले 61 वर्षीय भारतीय व्यक्तीचे प्राण)

बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी, कॅशबॅक ऑफर ईएमआय पर्यायाशिवाय लागू आहे. आयसीआयसीआय ग्राहक डेबिट कार्ड ईएमआयवरही कॅशबॅक मिळू शकते. पेटीएमच्या माध्यमातून सुद्धा होंडा ग्राहकांना 2,500 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकचा फायदा होऊ शकतो.

होंडा जॉय क्लब (Honda Joy Club) :

होंडा जॉय क्लबमध्ये नाव नोंदवूनही ग्राहक अनेक सुविधा, बक्षिसं आणि फायदे मिळवू शकतात. सभासद होण्यासाठी केवळ 349 रुपयांचा खर्च होतो आणि यात मोबिक्विकवर 200 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक, 340 होंडा करन्सी आणि 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक अपघात विमा संरक्षणचा समावेश आहे.

(वाचा - 4 लाखांहून कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता या जबरदस्त कार; मायलेज जास्त, किंमत कमी)

ग्राहकांना वाहन सेवा, स्पेअरपार्टस, देय कामगार शुल्क, होंडाच्या नेटवर्कवर विनामूल्य पिकअप आणि ड्रॉप इत्यादी सूट मिळू शकते आणि त्यांच्या सध्याच्या होंडा २ व्हीलरच्या ग्राहकांना रेफरल्ससाठी किंवा एक्सचेंजसाठी बोनस पॉईंट्स सुद्धा मिळतात. या व्यतिरिक्त, लाइफस्टाइल, कपडे, रेस्टॉरंट्स, फार्मसी आणि करमणूक करणाऱ्या 30 ब्रँड्सची सेवा घेताना होंडातून कमवलेल्या पॉईंट्सचा वापर केला जाऊ शकतात.

First published: