मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

रिलायन्स Jio लाँच करणार स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त 15 हजार

रिलायन्स Jio लाँच करणार स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त 15 हजार

रिलायन्स Jio लाँच करणार स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त 15 हजार

रिलायन्स Jio लाँच करणार स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त 15 हजार

Reliance Jio Laptops: रिलायन्स जिओ लवकरच बजेट लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याची किंमत सुमारे 15 हजार रुपये असेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 3 ऑक्टोबर: रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात दमदार एन्ट्री केल्यानंतर अल्पावधीतच या क्षेत्रात दमदार पकड मिळवली आहे. अलीकडच्या काळात जिओनं स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता रिलायन्स जिओनं लॅपटॉप मार्केटमध्येही दस्तक देण्याची तयारी केली आहे. एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की कंपनी लवकरच भारतात आपला स्वस्त लॅपटॉप लॉन्च करणार आहे. त्याची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली जाईल. यापूर्वी कंपनीनं स्वस्त फोनही बाजारात आणले आहेत.

रिलायन्स जिओ लवकरच बजेट लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याची किंमत सुमारे 15 हजार रुपये असेल. रिलायन्सनं जिओच्या आधी स्वस्त फोनही लॉन्च केले आहेत. आता कंपनी बजेट 5G फोनसह स्वस्त लॅपटॉप JioBook लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

एका रिपोर्टनुसार, त्याची किंमत 184 डॉलर्स (सुमारे 15 हजार रुपये) ठेवली जाईल. रिलायन्स जिओ स्वस्त लॅपटॉपद्वारे बजेट विभागात स्वतःची पकड बनवण्यासाठी प्रयत्न करेल. सुत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने JioBookसाठी जागतिक-जायंट क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय कंपनी आर्म लिमिटेड आणि अनेक अॅप्सना सपोर्ट करण्यासाठी विंडोज ओएसचीही मदत घेणार आहे. सध्या ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

हेही वाचा: तब्बल 108MP कॅमेरा अन् दमदार फीचर्ससह स्मार्टफोन, वाचा डिटेल्स

रिलायन्स जिओचे भारतात 420 दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत. मात्र कंपनीनं सध्या या लॅपटॉपबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अहवालात असं सांगण्यात आलं आहे की हा लॅपटॉप या महिन्यापासून शाळा आणि सरकारी संस्थांसारख्या एंटरप्राइझ ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाईल. हा लॅपटॉप 4G-सक्षम असेल.

तर हा स्वस्त लॅपटॉप ग्राहकांसाठी पुढील तीन महिन्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या सेगमेंटमध्ये या लॅपटॉपची मागणी खूप जास्त असू शकते, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी कंपनीनं स्वस्त जिओफोन लॉन्च केला होता.

काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार हा फोन 100 डॉलर सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन बनला आहे. JioBook बाबत असं सांगण्यात आलं आहे की ते लोकल मॅन्युफॅक्चरर फ्लेक्ससह तयार केले जातील. मार्चपर्यंत कंपनीचे लाखो युनिट्स विकण्याची योजना आहे.

(Disclaimer: Network18 आणि News18lokmat चॅनेल/वेबसाइट ची संचालक संस्था ही एक स्वतंत्र मीडिया ट्रस्ट आहे ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)

First published:

Tags: Reliance Jio