चिनी सामनावरील बॅननंतरही 'या' चायनिज स्मार्टफोनची भारतात सर्वाधिक विक्री

चिनी सामनावरील बॅननंतरही 'या' चायनिज स्मार्टफोनची भारतात सर्वाधिक विक्री

भारतीय युजर्स कोणत्या ब्रँडचा स्मार्टफोन खरेदी करणं पसंत करतात, या लिस्टमध्ये चायनिज ब्रँड वरच्या क्रमांकावर आहेत. पाच चिनी स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरर्स कंपन्या जवळपास 93.6 टक्के भारतीय मार्केटवर कंट्रोल करत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : भारत जगातील सर्वात मोठं स्मार्टफोन मार्केट (Smartphone Market) आहे. एका अभ्यासानुसार, भारतीय युजर्स कोणत्या ब्रँडचा स्मार्टफोन खरेदी करणं पसंत करतात, या लिस्टमध्ये चायनिज ब्रँड वरच्या क्रमांकावर आहेत. या लिस्टमध्ये सर्वात मोठं मार्केट शेयर शाओमीचं (Xiaomi) आहे. रिपोर्टनुसार, या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये शाओमीने सर्वाधिक स्मार्टफोनची विक्री केली आहे.

जवळपास 1 कोटी 30 लाख शाओमी स्मार्टफोन ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान विक्री झाले आहेत. स्मार्टफोन मार्केटबाबतचा हा डेटा Canalys कडून शेअर करण्यात आला आहे. शाओमी 26.1 टक्के बाजार भागीदारीसह टॉपवर आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.1 टक्के अधिक आहे.

दुसऱ्या क्रमांकावर साउथ कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग (samsung) असून, यादरम्यान जवळपास 1 कोटी स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. सॅमसंगने 20.4 टक्के मार्केट शेयरवर कब्जा केला आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कंपनीचं मार्केट शेयर -0.2 टक्क्यांनी कमी झालं आहे.

भारतात टॉपच्या स्मार्टफोन विक्री लिस्टमध्ये वीवो (vivo) तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जवळपास 88 लाख फोनची विक्री केली. तसंच 17.6 टक्के मार्केट शेयरवर कंपनीने कब्जा केला आहे.

(वाचा - जुलै ते सप्टेंबरमध्ये 5 कोटी स्मार्टफोनची विक्री; टॉप 5 मध्ये चार चीनी कंपन्या)

चौथ्य क्रमांकावर रियलमी (realme) कंपनी असून, या कंपनीचा मार्केट शेयर गेल्या वर्षी 15.3 टक्के होता, तो यंदा वाढून 17.4 टक्के झाला आहे. कंपनीची ग्रोथ 23 टक्के असून, ही वाढ बाजारातील इतर स्मार्टफोन ब्रँड्सपैकी सर्वाधिक आहे.

पाचव्या स्थानावर ओप्पो (oppo) असून कंपनीने जवळपास 61 लाख स्मार्टफोन विकले आहेत. ओप्पोचं मार्केट शेयर 12.1 टक्के होतं.

(वाचा - WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; आता फ्रीमध्ये मिळणार नाही ही सुविधा)

दुसरीकडे apple iPhones ची मागणीही भारतात वाढते आहे. या तिमाहीमध्ये ऍपलने जवळपास 8 लाख आयफोनची विक्री केली आहे. कॅलिफोर्नियाच्या कंपनीला, भारतात ऑनलाईन स्टोर सुरू केल्यानंतर फायदा झाल्याचं चित्र आहे.

अशाप्रकारे या पाच चिनी स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरर्स कंपन्या जवळपास 93.6 टक्के भारतीय मार्केटवर कंट्रोल करत आहेत. Canalys चे शोध विश्लेषक वरुण कन्नन यांनी सांगितलं की, गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीनमधील तणाव लोकांमध्ये चर्चेचा विषय होता. परंतु बाजारात लोकांच्या खरेदी निर्णयावर याचा कोणताही परिणाम पाहायला मिळाला नाही.

(वाचा - देशात कोणतं Aadhaar Card आहे मान्य; UIDAI ने दिली संपूर्ण माहिती)

Published by: Karishma Bhurke
First published: October 24, 2020, 3:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या