Home /News /technology /

Amazon आणि Flipkartनंतर Snapdealच्या 'कम में दम' फेस्टिव्ह सेलची घोषणा

Amazon आणि Flipkartनंतर Snapdealच्या 'कम में दम' फेस्टिव्ह सेलची घोषणा

Snapdealचा Kum Mein Dum फेस्टिव्ह सेल 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

  नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलचा (Snapdeal) पहिला फेस्टिव्ह सेल 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. स्नॅपडील आपल्या फेस्टिव्ह सीजनसह प्रतिस्पर्धी फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉनसह (Amazon) बाजारात उतरली आहे. स्नॅपडीलने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 'कम में दम' (Kum Mein Dum)हा सेल 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. कंपनीच्या या सेलमध्ये 92 शहरांतील 1.25 लाखहून अधिक सेलर सामिल होणार आहेत. स्नॅपडीलने ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आणखी एक घोषित करण्याचं सांगितलं आहे.

  Realmeच्या फेस्टिव्ह सेलची घोषणा; टीव्ही, फोन, वॉच, इयरफोनवर 5 हजारपर्यंतची सूट

  फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल कंपनीचा वार्षिक 'बिग बिलियन डेज' (Big Billion Days) फेस्टिव सेल 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल Amazonने Great Indian Festival saleची घोषणा केली असून 17ते 20 ऑक्टोबर दरम्यान सेल असणार आहे. या सेलद्वारे देशभरातील एक लाखहून अधिक छोटी-मोठी दुकानं आणि किराणा स्टोर जोडली जाणार आहेत. अमेझॉन इंडियाने Amazon India दिलेल्या माहितीनुसार, या दुकानांना वेग-वेगळ्या कँपेनअंतर्गत जोडलं जाणार आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 20 हजारहून अधिक ऑफलाईन रिटेलर, किराणा आणि स्थानिक दुकानदार Shopkeepers भाग घेतील. हे दररोज लागणार सामान, मोठी उपकरणं आणि घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सामानाची विक्री करणार आहेत. MI फेस्टिव्हल सेल; केवळ 1 रुपयात खरेदी करू शकता स्मार्टफोन, टीव्ही
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या