मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook नंतर आता Instagram च्या लाखो युजर्सचा पर्सनल डेटा झाला लीक !

Facebook नंतर आता Instagram च्या लाखो युजर्सचा पर्सनल डेटा झाला लीक !

सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी 'चार्टबॉक्स' आणि 'टेकक्रंच'ने केला दावा

सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी 'चार्टबॉक्स' आणि 'टेकक्रंच'ने केला दावा

सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी 'चार्टबॉक्स' आणि 'टेकक्रंच'ने केला दावा

नवी दिल्ली, 22 मे : 'फेसबुक' वापरणाऱ्या युजर्सचा डेटा चोरी झाल्याचा प्रकार ताजा असतानाच, आता 'इन्स्टाग्राम'सुद्धा अशाच प्रकारच्या अडचणीत सापडलं आहे. इन्स्टाग्राम वापरणाऱ्या लाखो नामांकित लोकांचा वैयक्तिक डेटा चोरी झाला असल्याची माहिती आहे. यात कोणकोणत्या नामांकि व्यक्तिंचा समावेश आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ही संख्या लाखात असल्याचा दावा 'चार्टबॉक्स'या मुंबईतल्या सोशल मीडिया मार्केटिंग फर्मने केला आहे. तुमच्या आधार नंबरचा गैरवापर होऊ शकतो, असं करा आधार कार्ड करता लॉक 'टेकक्रंच' नावाच्या सोशल मीडिया फर्मनेसुद्धा इन्स्टाग्राम वापरणाऱ्या लाखो लोकांचा डेटा लीक झाला असल्याचं म्हटलं आहे. यात फूड ब्लॉगर्स, नामांकित व्यक्ती जसे की, सीने जगातील प्रसिद्ध तारे आणि तारका, अनेक नामांकित खेळाडू यांचा समावेश असल्याचं 'टेकक्रंच'ने म्हटलं आहे. या फर्मने आपल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, इन्स्टाग्राम वापरणाऱ्या नामांकि लोकांचा जो डेटा लीक झाला आहे, त्यात युजर्सचं लोकेशन, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, प्रोफाइल फोटो, फॉलोअर्सची संख्या अशी महत्त्वपूर्ण माहिती आहे. याबाबत 'टेकक्रंच'ने रिपोर्ट प्रकाशित करताच डेटाबेस ऑफलाइन करण्यात आलं. ''इन्स्टाग्रामचा डेटा खरंच लीक झाला आहे का? तो कोणी केला? की, आणखी कोणतं वेगळंच प्रकरण आहे? या सगळ्या गोष्टींचा आम्ही तपास सुरू केला आहे'', असं इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. युजर्सचे फोन नंबर आणि त्यांचे ईमेल हे 'चार्टबॉक्स'च्या डेटाबेसमध्ये इन्स्टाग्रामवरून आलेत की आणखी कुठून हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डेटा चोरी करणाऱ्यांची माहिती चुकीच्या पद्धतीने गोळा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं इन्स्टाग्रामने म्हटलं आहे. तसंच याचं गांभिर्य लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आला असल्याचंही इन्स्टाग्रामने म्हटलं आहे. हे झालंच कसं? याचा शोध घेतला जात असून, यासंदर्भात 'चॅटबॉक्स'ने अद्याप कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही.
First published:

Tags: Facebook

पुढील बातम्या