Home /News /technology /

फेसबुक, इन्स्टाग्रामनंतर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार अवतार फिचर, जाणून घ्या कसे करेल काम

फेसबुक, इन्स्टाग्रामनंतर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार अवतार फिचर, जाणून घ्या कसे करेल काम

फेसबुक, इन्स्टाग्रामनंतर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार अवतार फिचर, जाणून घ्या कसे करेल काम

फेसबुक, इन्स्टाग्रामनंतर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार अवतार फिचर, जाणून घ्या कसे करेल काम

Whatsapp Avatar Features: व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन वैशिष्ट्य आणत आहे, ज्याद्वारे वापरकर्ते व्हिडिओ कॉल दरम्यान त्यांचा आभासी अवतार इतर वापरकर्त्यांना दाखवू शकतील. फेसबुक (Facebook) मेसेंजरवर आणि नंतर इन्स्टाग्रामवर (Instagram) हे फिचर आधीच सुरू करण्यात आले आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जून: इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत आपण आपला जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर घालवतो. यातही आपला बहुतांश वेळ फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घालवतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत नवनवीन फिचर्स आणत असतात. अलीकडेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अवतार फिचर दिलं गेलं होतं. आता व्हॉट्सअ‍ॅपवरही हे फिचर दिलं जाणार आहे. सुप्रसिद्ध सोशल मीडिया अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) एका नवीन फिचरवर काम करत आहे. ज्याद्वारे यूजर्स व्हिडिओ कॉल्स दरम्यान त्यांचा व्हर्च्युअल अवतार (Avatar Feature in Whatsapp) इतर यूजर्सना दाखवू शकतील. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच युजर्ससाठी हे फिचर आणू शकते. नुकतेच मेटाने अवतार स्टोअर सादर केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने हे पाऊल उचलले आहे. TechRadar नुसार, अवतार फीचर प्रथम फेसबुक मेसेंजरवर आणि नंतर इंस्टाग्रामवर आणले गेले. त्याच वेळी, WABetaInfo नुसार, अवतार फिचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना दिलं जाईल. या फिचरच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल दरम्यान 'अवतारवर स्विच' करण्याची परवानगी मिळेल. या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच अवतार एडिटर (Avtar Editor) नावाचा सेक्शन दिला जाईल, जो कस्टमाईज केला जाऊ शकतो आणि चॅटमध्ये वापरला जाऊ शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की इन्स्टाग्रामने नुकतेच हे वैशिष्ट्य जोडले आहे. हे फिचर केवळ व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइडपुरते मर्यादित नसून भविष्यात ते iOS वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध होईल. हेही वाचा- स्मार्टफोन-लॅपटॉपवर क्षणात डाऊनलोड करू शकता Instagram Reels; Android-iPhone युजर्ससाठी खास ट्रिक एका क्लिकवर उपलब्ध होणार कार्टून सारखा अवतार- तुमच्या व्हॉट्सअरमध्ये अवतार चालू होताच तुमचे व्हॉट्सअप अजून आकर्षक होईल. तुम्ही अवतार चालू करताच, युजर्सना तुमच्या जागी तुमचा कार्टूनसारखा अवतार दिसेल. तसं पाहिलं तर अ‍ॅपल आयफोनमध्येही तत्सम वैशिष्ट्य आधीच उपलब्ध आहे. हा आभासी अवतार तुमच्या अभिव्यक्तीनुसार कार्य करतो. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर अँड्रॉईड बीटा व्हर्जनसाठी हे फिचर दिसले आहे. हेही वाचा- Alexa मुळे हेसुद्धा शक्य झालं! प्रिय व्यक्तीच्या मृ्त्यूनंतरही तुम्ही ऐकू शकता तिचा आवाज न्यू एग्जिट फिचर- यापूर्वी WABetaInfo ने नवीन एक्झिट फिचरबद्दल माहिती दिली होती. हे फिचर आल्यानंतर एखाद्या युजरने ग्रुप सोडण्याची माहिती फक्त ग्रुप अ‍ॅडमिनला दिली जाईल. ट्रॅकरने शेअर केलेला स्क्रीनशॉट दाखवतो की जेव्हा एखादा युजर ग्रुप सोडतो तेव्हा फक्त ग्रुपच्या अ‍ॅडमिनला सूचित केले जाते.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Tech news, Technology, Whatsapp, WhatsApp features

    पुढील बातम्या