होय, डेटा हाताळण्यात चुका झाल्या - मार्क झकरबर्ग यांची कबुली

होय, डेटा हाताळण्यात चुका झाल्या - मार्क झकरबर्ग यांची कबुली

होय, डेटा हाताळण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या, आम्ही तो हवा तितका सुरक्षित ठेवू शकलो नाही.

  • Share this:

22 मार्च : फेसबुक युजर्सच्या डेटाचा गैरवापर काही खासगी कंपन्यांनी केला, यावरून जगभरात गदारोळ सुरू आहे. यावर अखेर मार्क झकरबर्गनं मौन सोडलंय. होय, डेटा हाताळण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या, आम्ही तो हवा तितका सुरक्षित ठेवू शकलो नाही. याची सखोल चौकशी करू आणि पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेऊन, असं मार्कनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

झकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,देश

'युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं आमची जबाबदारी आहे. जर आम्ही यामध्ये अपयशी ठरत असू तर ही आमची चूक आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही अनेक पाऊलं उचलली होती, आमच्याकडून अनेक चुकाही झाल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मी फेसबुकचा संस्थापक आहे, त्यामुळे फेसबुक संबंधित कोणतीही चुकीची गोष्ट होत असेल तर त्यास मी जबाबदार आहे. झालेल्या प्रकरणांतून आम्ही आमच्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहू आणि पुन्हा तुमचा विश्वास संपादीत करू'

काय आहे हे प्रकरण?

एनालिटिक्स फर्म केंम्ब्रिज एनालिटिकाने फेसबुकवर 5 कोटी पेक्षा जास्त युझर्सची खासगी माहिती गोळा केली आहे. एवढंच नाहीतर अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत या डेटाचा वापर केला असा गंभीर आरोप केंम्ब्रिज एनालिटिकावर करण्यात आलाय. या आरोपानंतर जगभरात खळबळ उडाली असून युझर्स फेसबुक अकाऊंट डिलीट करत आहे.

First published: March 22, 2018, 9:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading