मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Amazon Prime, Netflix ला टक्कर, भारतात लाँच होणार नवा OTT प्लॅटफॉर्म

Amazon Prime, Netflix ला टक्कर, भारतात लाँच होणार नवा OTT प्लॅटफॉर्म

NBCUniversal कडून आपल्या अॅड फ्री सब्सक्रिप्शन व्हिडीओ-ऑन डिमांड SVOD सर्विस ‘hayu’ भारतात लाँच करण्यात येणार आहे.

NBCUniversal कडून आपल्या अॅड फ्री सब्सक्रिप्शन व्हिडीओ-ऑन डिमांड SVOD सर्विस ‘hayu’ भारतात लाँच करण्यात येणार आहे.

NBCUniversal कडून आपल्या अॅड फ्री सब्सक्रिप्शन व्हिडीओ-ऑन डिमांड SVOD सर्विस ‘hayu’ भारतात लाँच करण्यात येणार आहे.

  नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : NBCUniversal कडून आपल्या अ‍ॅड फ्री सब्सक्रिप्शन व्हिडीओ-ऑन डिमांड SVOD सर्विस ‘hayu’ भारतात लाँच करण्यात येणार आहे. रिअ‍ॅलिटी शोचे चाहते असलेल्या प्रेक्षकांना लक्ष्य करुन हायू रिअ‍ॅलिटी टीव्ही कंटेंटचे 8000 हून अधिक एपिसोड सादर करतात. हे अ‍ॅप मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप, कनेक्टेड TV आणि सिलेक्टेड कंसोलवर उपलब्ध आहे. सब्सक्रायबर्सला यासाठी 3 महिन्यांसाठी 349 रुपये किंवा 12 महिन्यांसाठी 999 रुपये द्यावे लागतील. ही सर्विस इंग्रजी भाषेत अनस्क्रिप्टेड जॉनरची विविधता जारी करतात, ज्यात होम अँड डिझाइन, डेटिंग कूकिंग, फॅशन आणि ट्रू क्राइम सामिल आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही सर्विस पुढील वर्षी लाँच केली जाण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही गोष्ट अधिकृतरित्या सांगण्यात आलेली नाही. Hayu च्या मॅनेजिंग डायरेक्टर्सनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात रिअ‍ॅलिटी टीव्हीची मोठी लोकप्रियता आहे. हीच लोकप्रियता पाहता आम्ही भारतात Hayu लाँच करण्याचा विचार करत आहोत. हे बाब आमच्यासाठी अतिशय आनंदाची असून भारतीयांना चांगला कंटेंट देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. चांगल्या अनस्क्रिप्टेड कंटेंटसह भारतीय युजर्सला सुपर-सर्विस देण्याचा आणि भारतीयांना आमचा कंटेंट, सर्विस पसंतीस उतरेल अशा आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

  Amazon Outage: अ‍ॅमेझॉनला मोठा फटका; प्राइम व्हिडीओ, डिस्ने प्लस, किंडलसह अनेक सेवा कोलमडल्या

  HBO Max लवकरच होऊ शकतं लाँच - नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्ने + हॉटस्टार हे विदेशी OTT प्लॅटफॉर्म भारतात जबरदस्त पॉप्युलर आहेत. या वर्षी सप्टेंबर महिन्यात वॉर्नर ब्रदर्सचे HBO Max च्या प्लॅन किंमत लीक झाली होती. त्यामुळे आता भारतीय युजर्सला Hayu सह आणखी OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ शकतात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: OTT

  पुढील बातम्या