• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Airtel नंतर आता Jio नेही मुंबईत सुरू केलं 5G ट्रायल, मिळाला जबरदस्त स्पीड

Airtel नंतर आता Jio नेही मुंबईत सुरू केलं 5G ट्रायल, मिळाला जबरदस्त स्पीड

Airtel नंतर आता Reliance Jio नेही मुंबईत 5G ट्रायल सुरू केलं असल्याची माहिती आहे. 5G ट्रायलसाठी देशातच डेव्हलप केलेल्या 5G इक्विपमेंट्स आणि टेक्नोलॉजीचा वापर केला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 16 जून : देशात 5G वर काम सुरू करण्यात आलं आहे. टेलिकॉम कंपन्या यासाठी ट्रायल करत आहेत. नुकतंच Bharti Airtel ने 5G ट्रायल गुरुग्राममध्ये सुरू केलं आहे. यात डाउनलोड स्पीड 1Gbps पर्यंत आहे. आता Reliance Jio नेही मुंबईत 5G ट्रायल सुरू केलं असल्याची माहिती आहे. 5G ट्रायलसाठी देशातच डेव्हलप केलेल्या 5G इक्विपमेंट्स (Indigenously Developed Equipment) आणि टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. त्याशिवाय इतर Samsung, Ericson आणि Nokia सोबत चर्चा सुरू आहे, जेणेकरुन दुसऱ्या शहरांतही येणाऱ्या काळात ट्रायल सुरू केलं जाऊ शकेल. एका सीनियर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, Reliance Jio मिड आणि mmwave बँड्स दोघांचा वापर करुन मुंबईत 5G ट्रायल करत आहे. याचा स्पीड 4G हून अतिशय अधिक असल्याचंही ते म्हणाले. 5G इक्विपमेंट्सला भारतात लोकल पोर्टनरच्या मदतीने मॅन्युफॅक्चर करण्यात आलं आहे. साईट डिप्लोएड प्रकरणात Jio चं 5G ट्रायल अतिशय मोठं आहे. ट्रायल लवकरच इतर शहरांत सुरू केलं जाईल. 5G टेक्नोलॉजी आरोग्यासाठी हानीकारक आहे? COAI ने दिलं उत्तर दिल्ली, मुंबई, गुजरात आणि हैदराबादमध्ये Jio ने ट्रायलसाठी अप्लाय केलं आहे. डिपोर्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने नुकतंच 5G ट्रायलसाठी 700MHz, 3.5 GHz आणि 26GHz बँड्स स्पेक्ट्रम Airtel, Reliance Jio आणि Voddafone Idea साठी उपलब्ध करुन दिलं होतं. 5G चा तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम; जाणून घ्या या टेक्नोलॉजीबद्दल Airtel ने Ericson सह पार्टनरशिप करुन गुरुग्राममध्ये 5G ट्रायल सुरू केलं आहे. Airtel ला दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये 5G ट्रायलसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published: