Home /News /technology /

आता भारतात Two wheeler मध्ये वापरली जाणार ADAS टेक्नोलॉजी; अपघातावेळी ठरणार मदतशीर; वाचा कसं करेल काम

आता भारतात Two wheeler मध्ये वापरली जाणार ADAS टेक्नोलॉजी; अपघातावेळी ठरणार मदतशीर; वाचा कसं करेल काम

भारतीय दुचाकी वाहन बाजारात आता अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेन्स (ADAS) टेक्नोलॉजी आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतात कोणती दुचाकी वाहन निर्माता कंपनी या टेक्नोलॉजीचा सर्वात आधी वापर करणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

  नवी दिल्ली, 10 एप्रिल : इस्रायलच्या राईड विजन कंपनीशी मिंडा कॉर्पोरेशनने भागीदारी केली आहे. ज्याअंतर्गत भारतीय दुचाकी वाहन बाजारात आता अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेन्स (ADAS) टेक्नोलॉजी आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे भारतीय बाजाराची आवश्यकता पूर्ण होईल. भारतात कोणती दुचाकी वाहन निर्माता कंपनी या टेक्नोलॉजीचा सर्वात आधी वापर करणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. कसं काम करेल ADAS टेक्नोलॉजी - मिंडा कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अशोक मिंडा यांनी इस्रायलच्या राईड विजन कंपनीशी केलेल्या भागीदारीबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही नवी टेक्नोलॉजी भारतात टू-व्हिलर चालवणाऱ्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तसंच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयच्या 2030 पर्यंत शून्य रोड फॅसिलिटीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या टेक्नोलॉजीची मदत होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मिंडा कॉर्पोरेशन लोकांच्या सुरक्षेसाठी चांगली उत्पादनं, उत्तम टेक्नोलॉजी आणि लोकांच्या चांगल्या संरक्षणासाठीच्या उपायांवर काम करेल, असंही ते म्हणाले.

  (वाचा - ड्रायव्हिंग टेस्टवेळी या चुकीमुळे 31 टक्के लोक होतात फेल, या गोष्टीकडे द्या लक्ष)

  आतापर्यंत केवळ लग्झरी कार्समध्ये आहे ही टेक्नोलॉजी - भारतात दुचाकी आणि तीनचाकी वाहन चालवणाऱ्यांसाठी सुरक्षेच्यादृष्टीने हे आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत ही नवी सुरक्षा टेक्नोलॉजी अतिशय प्रभावी ठरणार आहे. ही टेक्नोलॉजी यापूर्वी काही प्रीमियम कार्समध्ये पाहण्यात आली होती, ज्याला आता दोन आणि तीनचाकी वाहनांमध्ये टेस्ट केलं जात आहे. अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेन्स टेक्नोलॉजीमध्ये कॉलिजन अवॉइडेंस, ऑटो व्हिडीओ रेकॉर्डिंग, डिस्टेन्स कीपिंग अलर्ट, ब्लाइंट स्पॉट अलर्ट आणि धोकादायक ओव्हरटेक अलर्ट यासारखे खास फीचर्स देण्यात येणार आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या