या 12 प्रकारच्या Emails वर क्लिक केल्याने तुमचं अकाउंट होऊ शकतं हॅक!

अनेकदा होतं असं की जेव्हाही आपल्याला ईमेल येतो तेव्हा सब्जेक्टवर लक्ष न देता ओपन करतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 05:35 PM IST

या 12 प्रकारच्या Emails वर क्लिक केल्याने तुमचं अकाउंट होऊ शकतं हॅक!

मुंबई- तंत्रज्ञानाच्या युगात आज प्रत्येकजणच इंटरनेटशी जोडला गेला आहे. यामुळेच सायबर क्राइमच्या घटनाही दिवसें दिवस वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूरवी सायबर सिक्युरिटी कंपनी बराक्यूडा नेटवर्क्सने 3.6 लाख ईमेलवर संशोधन केलं. या संशोधनात असं समोर आलं की, 12 असे खोटे ईमेल सब्जेक्ट लाइन आहेत, ज्यावरून सर्वाधिक Email येतात. विशेष म्हणजे, ईमेल ही सर्वात प्राथमिक गोष्ट आहे ज्यावरून अनेकदा धोकादाय लिंक पाठवल्या जातात आणि मालवेअरचे शिकार होतात.

अनेकदा होतं असं की जेव्हाही आपल्याला ईमेल येतो तेव्हा सब्जेक्टवर लक्ष न देता ओपन करतो. पण सब्जेक्ट वाचल्याशिवाय किंवा तो मेल कोणी पाठवला हे पाहिल्याशिवाय मेल ओपन करतो. यामुळे हॅकर्सला आयती संधी मिळते आणि ते तुमचं अकाउंट हॅक करतात. चला तर मग जाणून घेऊ की असे कोणत्या सामान्य ईमेल लाइन आहेत ज्यांना हॅकर्स सर्वात जास्त प्रमाणात वापरतात.

1-Request

2-Follow Up

3-Urgent/Important

Loading...

4-Are you available?/Are you at your desk

5-Payment Status

6-Hello

7-Purchase

8-Invoice Due

9-Re:

10-Direct Deposit

11-Expenses

12-Payroll

बँक अकाउंटशी निगडीत असो किंवा कोणतीही खासगी गोष्ट असतो, अनेकांच्या सर्वाधिक गोष्टी या ईमेलवर असतात. जर तुम्हाला वरील 12 सब्जेक्टपैकी एका नावाने मेल आला असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमच्या एका क्लिकने तुमची सर्व माहिती हॅक होऊ शकते. एकदा का तुमचं अकाउंट हॅक झालं तर तुमची खासगी माहिती मिळवणं हॅकर्सला फारसं कठीण नसतं.

Swiggy वर लोक सर्वाधिक हा पदार्थ करतात ऑर्डर

आता सिगारेट न ओढणाऱ्यांना मिळणार अतिरिक्त 6 सुट्ट्या

यामुळे आजही देशात इतर राज्यांपेक्षा जम्मू- काश्मीर आहे सर्वोत्तम

कमी खर्चात अशा प्रकारे सजवू शकता तुमचं स्वप्नातलं घर 

सांगलीत गर्भवती महिलेचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: technology
First Published: Aug 8, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...