VIDEO : हॅलो गुगल म्हणणाऱ्या Google Assistant ने आदेश देताच झाडली गोळी

VIDEO : हॅलो गुगल म्हणणाऱ्या Google Assistant ने आदेश देताच झाडली गोळी

काही दिवसांपूर्वी Google Assistant वर एक प्रयोग करण्यात आला. जो पाहिला की तुम्हाला मोठा धक्का बसेल.

  • Share this:

05 जून : लाइट ऑन, कामाबद्दल रिमांड करणे, लोकांची भाषा कॉपी करणे, अशा अनेक कार्य Google Assistant च्या सहाय्याने आपल्याला सहज पूर्ण करता येतात. पण तुम्ही कधी विचार केलाय की हेच गुगल असिस्ट अतिशय धोकायदक सुद्धा असू शकते.

काही दिवसांपूर्वी Google Assistant वर एक प्रयोग करण्यात आला. जो पाहिला की तुम्हाला मोठा धक्का बसेल.. कारण तुमच्या एका इशाऱ्यावर गुगल असिस्ट काहीही करू शकतं.

अॅलेक्झांडर रेबेन नावाच्या एका कलाकाराने गुगल असिस्ट बरोबर एक प्रयोग केला. एक सुचना देताच लक्षावर अचूकपणे एक गोळी मारण्यात आली.

रेबॅनने हे सर्व कॅमेरात रेकॉर्ड करून हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला. "गूगल शूट्स," नावाने हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड आहे. 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये रेबेन गुगलला ऑर्डर देतात, '' ओके Google, फायर... '' त्याच्या एक सेकंद नंतर गुगल असिस्टंट गोळी झाडतो.

engadget.com शी बोलताना रेबेन सांगितलं की, यासाठी मी Google Assistant चा वापर केला पण या ठिकाणी अॅमेझाॅन इको आणि इतर कोणतेही डिव्हाईस असू शकते.

त्यामुळे भविष्यात Google Assistant कडून जर कुणाच्या हत्येसाठी वापर झाला तर हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं त्यामुळे गुगलने याची दखल घेणे गरजेचं आहे.

First published: June 5, 2018, 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading