Home /News /technology /

Battlegrounds Mobile India गेम खेळायचाय? मग या अटी करा मान्य; अन्यथा...

Battlegrounds Mobile India गेम खेळायचाय? मग या अटी करा मान्य; अन्यथा...

हा गेम खेळण्यासाठी यूजर्सना काही महत्त्वाच्या अटी मान्य कराव्या लागणार आहेत.

    नवी दिल्ली, 17 जून : भारतात मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांची  कमी नाहीये. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत (Mobile Gamers in India) गेम खेळण्यासाठी अक्षरशः वेडे आहेत. गेल्या वर्षी भारत सरकारनं (Government of India) काही चिनी अप्लिकेशन्स (Ban on Chinese Apps) आणि गेम्सवर बंदी घातली होती. त्यात जगभरात प्रसिद्ध असलेल्या PUBG या गेमचाही समावेश होता. हा गेम बंद केल्यामुळे अनेकांची निराशा झाली होती. मात्र आता या गेमचं भारतीय व्हर्जन लवकरच लाँच होणार आहे. Battlegrounds Mobile India असं नाव या गेमला देण्यात आलंय. मात्र हा गेम खेळण्यासाठी यूजर्सना काही महत्त्वाच्या अटी मान्य कराव्या लागणार आहेत. कंपनीनं आपल्या सपोर्ट पेजवर यासंबंधीची माहिती दिली आहे. OTP शिवाय होणार नाही लॉग इन गेल्या वर्षी डेटा चोरी आणि भारताच्या संरक्षणाला धोका असल्या कारणानं PUBG मोबाईलवर बंदी घेण्यात आली होती. त्यामुळे आता या नवीन भारतीय व्हर्जनमध्ये कडक सिक्युरिटी असणार आहे. फेसबुक (Facebook) , ट्विटर (Twitter) आणि गुगलवरून (Google) लॉग इन न करता आता मोबाईल नंबर आणि OTP वापरून या गेममधे लॉग इन करता येणार आहे. OTP एंटर केला नाही तर गेम खेळता येणार नाही. हे वाचा - इव्हेंटच्या आधीच मायक्रोसॉफ्टची मोठी माहिती लीक या असतील अटी या गेमला लॉग इन करण्यासाठी OTP ऑथेंटिकेशन असणं महत्वाचं असणार आहे. OTP व्हेरिफाय झाल्यानंतरच यूजर्सना गेम खेळता येणार आहे. व्हेरिफाय कोड एंटर करण्यासाठी यूजर्सना तीन चान्स मिळणार आहेत. तीनही वेळा चूक झाल्यास पुन्हा एंटर करता येणार नाही. एक व्हेरिफिकेशन कोड फक्त पाच मिनिटांसाठी लागू असेल. यूजर्स फक्त दहा OTP रिक्वेस्ट करू शकतात त्यानंतर रिक्वेस्ट केल्यास 24 तासांसाठी मान्य होणार नाही. एक फोन नंबरवरून जास्तीत जास्त दहा अकाउंट रजिस्टर केले जाऊ शकतात.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Delhi, Game, Pubg game

    पुढील बातम्या