Home /News /technology /

Amazon Great Indian Festival च्या एक दिवस आधीच Flipkart Big Billion Days ची घोषणा

Amazon Great Indian Festival च्या एक दिवस आधीच Flipkart Big Billion Days ची घोषणा

Flipkart ने आधी 7 ऑक्टोबरपासून Big Billion Days सेलची घोषणा केली होती. परंतु Amazon च्या Great Indian Festival च्या 4 ऑक्टोबरच्या घोषणेनंतर आता Flipkart ने त्यांच्या सेलची तारीख बदलत, Amazon सेलच्या एक दिवस आधीच सेलची घोषणा केली आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : Flipkart ने त्यांच्या Big Billion Days सेलच्या तारखेत बदल केला आहे. आता 3 ऑक्टोबरपासून हा सेल सुरू आहे. याआधी सेलची तारीख 7 ऑक्टोबर जाहीर करण्यात आली होती. परंतु आता Flipkart Big Billion Days 7 ऑक्टोबरऐवजी 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 10 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. दुसरीकडे Amazon ने त्यांचा Great Indian Festival सेल 4 ऑक्टोबर रोजी लाइव्ह होण्याची घोषणा केली आहे. Amazon Great Indian Festival सेलच्या एक दिवस आधीच Flipkart ने तारखेत बदल करत 3 ऑक्टोबरपासून Big Billion Days ची सुरूवात होण्याचं सांगितलं आहे. फेस्टिव्ह सीजनदरम्यान, ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये सेलसाठी मोठी चढाओढ असल्याचं पाहायला मिळतं. अनेक ग्राहकही सेलमध्ये कमी दरातील वस्तू घेण्यासाठी अशा बंपर सेलची वाट पाहत असतात. Flipkart ने आधी 7 ऑक्टोबरपासून Big Billion Days सेलची घोषणा केली होती. परंतु Amazon च्या Great Indian Festival च्या 4 ऑक्टोबरच्या घोषणेनंतर आता Flipkart ने त्यांच्या सेलची तारीख बदलत, Amazon सेलच्या एक दिवस आधीच त्यांच्या सेलची घोषणा केली आहे.

  Flipkart Xtra: फेस्टिव्ह सीजनआधी Flipkart मध्ये नोकरीची संधी, 4000 लोकांना मिळेल जॉब

  Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival Sale) 4 ऑक्टोबरपासून लाइव्ह होणार आहे. हा सेल कधी संपेल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Amazon Prime Members एक दिवस आधीच सेल ऑफर अॅक्सेस करू शकतात. प्राइम मेंबर्सला अॅडिशनल कॅशबॅक, एक्सटेंडेड No Cost EMI चा फायदाही मिळणार आहे.

  Amazon Great Indian Festival 2021 ची घोषणा, डिस्काउंटसह मिळतील जबरदस्त ऑफर्स

  Flipkart वर Flipkart Big Billion Days सेल 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. सेलमध्ये अॅक्सिस बँक, ICICI बँकच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये Paytm वॉलेट आणि UPI ट्रान्झेक्शनद्वारे पेमेंट केल्यास एश्योर्ड कॅशबॅक मिळेल. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये स्मार्टफोन, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निशिंग प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिल्स आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Amazon, Flipkart, Tech news

  पुढील बातम्या