Flipkart ची विद्यार्थ्यांसाठी बंपर ऑफर; लॅपटॉप, मॉनिटर आणि इतर गॅजेट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट

Flipkart ची विद्यार्थ्यांसाठी बंपर ऑफर; लॅपटॉप, मॉनिटर आणि इतर गॅजेट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट

तब्बल 80 टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. बॅक टू कॉलेज सेल (Back to College Sale) असं या फ्लिपकार्ट सेलचं नाव आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून : जर तुम्ही विद्यार्थी (Student) असाल आणि तुम्ही अभ्यासासाठी किंवा अन्य कामांसाठी लॅपटॉप (Laptop), मॉनिटर (Monitor), हेडफोन्स (Headphones) किंवा अन्य आवश्यक गोष्टी (Electronic Gadgets) विकत घेण्याचा विचार करत असाल, तर या वस्तू खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण फ्लिपकार्टवर (Flipkart) विद्यार्थ्यांसाठी एक खास सेल सुरू आहे. त्यात आपल्या आवडीची गॅजेट्स तब्बल 80 टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. बॅक टू कॉलेज सेल (Back to College Sale) असं या फ्लिपकार्ट सेलचं नाव आहे. 21 जून ते 24 जून या चार दिवसांच्या कालावधीसाठीच हा सेल मर्यादित आहे.

सध्या कोरोनामुळे अनेक कर्मचाऱ्यांना घरूनच काम करावं लागतंय, त्याप्रमाणेच शाळा-कॉलेजेसही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासही घरूनच करावा लागतोय. त्यामुळे लॅपटॉप, मॉनिटर, हेडफोन्स, टॅबलेट, पॉवर बँक अशा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जास्त गरज भासू लागली आहे. त्यामुळे या वस्तूंचा सेल फ्लिपकार्टने आयोजित केला आहे. एचडीएफसी (HDFC) क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांना नो कॉस्ट ईएमआयसह 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंटही मिळणार आहे. तुम्ही खरंच विद्यार्थी आहात हे व्हेरिफाय करू शकलात, तर तुम्हाला अधिकच फायदा होईल. कारण या सगळ्या प्रॉडक्ट्सवर या सगळ्या सवलतींव्यतिरिक्त फ्लॅट 750 रुपयांचा स्टुडंट बेनिफिटही मिळेल.

या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससाठी फ्लिपकार्टकडून प्रोटेक्शन प्लॅनही (Protection Plan) ऑफर केला जात आहे. या प्लॅनची सुरुवात 799 रुपयांपासून होत आहे. तुमच्याकडे जुनी गॅजेट्स असतील आणि ती चालू स्थितीत असतील, तर ती एक्स्चेंज (Exchange) करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी 7000 रुपयांपर्यंतचा एक्स्चेंज बोनस दिला जात असून, 9 महिन्यांसाठीचा ईएमआय पर्यायही उपलब्ध करून दिला जात आहे. या सेलमध्ये 329 रुपयांपासूनच्या वस्तूंचा समावेश आहे. 2199 रुपये किमतीपासून सुरू होणाऱ्या प्रिंटरचाही या सेलमध्ये समावेश आहे.

(वाचा - Online Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मिळणार नाही Flash Sale ची सवलत)

लॅपटॉपवर डिस्काउंट -

- HP 15s Ryzen 3 हा 8GB रॅम आणि 1TB HDD क्षमतेचा लॅपटॉप 36,490 रुपयांत उपलब्ध

- 8GB रॅम आणि 512GB SSD या क्षमतेचा Asus VivoBook i5 हा लॅपटॉप 55,990 रुपये किमतीला उपलब्ध

- Cire i5 10 Gen चा Mi Notebook 14 43,990 रुपये किमतीला उपलब्ध

- Asus VivoBook Core i3 4GB रॅम आणि 1TB HDD यांसह 37,990 रुपये किमतीला उपलब्ध आहे.

(वाचा - धमाकेदार ऑफर; केवळ 1 रुपयांत मिळवा ProBuds Earbuds, 25 तासांपर्यंत चालेल बॅटरी)

गेमिंग लॅपटॉप -

- Lenovo Core i5 3GB ग्राफिक कार्डसह 48,990 रुपयांना उपलब्ध

- 8GB रॅम आणि 512GB SSD सह Acer Aspire 5 Ryzen 5 हा लॅपटॉप 50,990 रुपयांना उपलब्ध

- NVIDIA GTX 1650 सह HP Pavillion Ryzen 5 ची किंमत केवळ 49,990 रुपये

- NVIDIA RTX 2060 सह MSI GP65 ची किंमत 1,04,999 रुपये

Published by: Karishma Bhurke
First published: June 22, 2021, 8:00 PM IST

ताज्या बातम्या