Home /News /technology /

तुमची गाडी 8 वर्ष जुनी आहे? दरवर्षी करावं लागेल हे काम, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

तुमची गाडी 8 वर्ष जुनी आहे? दरवर्षी करावं लागेल हे काम, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

पर्यावरण आणि गाडी चालकांची सुरक्षा लक्षात घेता केंद्र सरकार 1 एप्रिल 2023 पासून नवा नियम लागू करणार आहे.

  नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : पर्यावरण आणि गाडी चालकांची सुरक्षा लक्षात घेता केंद्र सरकार 1 एप्रिल 2023 पासून नवा नियम लागू करणार आहे. या नियमांतर्गत 8 वर्ष जुन्या कमर्शियल वाहनांची दरवर्षी फिटनेस टेस्ट (Fitness Test) करणं अनिवार्य असणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2 फेब्रुवारी रोजी ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी करत यासाठी हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 8 वर्षाहून कमी जुन्या असलेल्या बस आणि ट्रकला दोन वर्षातून एकदा फिटनेस टेस्ट करावी लागेल. तर 8 वर्षाहून अधिक जुन्या कमर्शियल वाहनाला दरवर्षी फिटनेस टेस्ट करणं अनिवार्य असेल. तसंच ही फिटनेस टेस्ट केवळ लिस्टेड ऑटोमेटेड फिटनेस स्टेशनवर करणं आवश्यक असेल.

  हे वाचा - कार घ्यायची आहे पण Electric घ्यावी की CNG? खरेदीपूर्वी वाचा दोन्हींचे फायदे-तोटे

  ...तर भरावा लागेल मोठा दंड - मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू न केल्यास दंड भरावा लागेल. तसंच अशी वाहनं रस्त्यावर चालवण्यासही बंदी घातली जाईल. अशी वाहनं अधिक इंधन खर्च करतात आणि यामुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो. याचमुळे दुर्घटनाही होतात. यावर नियंत्रण मिळवल्यास प्रवाशांची सुरक्षा वाढेल, तसंच पर्यावरण सुधारण्यासही मदत होईल. याआधी सरकारने 15 वर्ष जुनी कमर्शियल वाहनं आणि 20 वर्ष जुनी खासगी वाहनं स्क्रॅप करण्याची योजना स्क्रॅपेज पॉलिसी आणली आहे. आता हा नवा नियम याच दिशेने आणखी एक पुढचं पाऊल आहे.

  हे वाचा - मृत्यूनंतर PAN आणि Aadhaar Card चं काय होतं.? वाचा काय आहे नियम

  स्क्रॅपेज पॉलिसीसाठी भारत सरकार फिटनेस टेस्टचे हायटेक आर अँड सी सेंटर्स 10 राज्यात स्थापन करणार आहे. यासाठी केंद्राकडून 22 डिसेंबर 2021 रोजी नोटिफिकेशनही जारी करण्यात आलं. या सेंटर्सवर टू-व्हीलर, थ्री-व्हीलर, फोर-व्हीलर, प्रायवेट आणि कमर्शियल वाहनांची फिटनेस टेस्ट करुन सर्टिफिकेट दिलं जाईल आणि खास स्टिकर्स या वाहनांवर लावले जातील. याच सेंटर्सवर पीयूसीचीही (PUC) तपासणी केली जाईल. या सेंटर्सवर फिटनेस टेस्ट करणाऱ्या वाहन आणि त्यांच्या मालकांचे सर्व डिटेल्स सरकारी वेबसाइटवर दिले जातील.

  हे वाचा - बाइकच्या खर्चात मेंटेन करता येईल चारचाकी, या आहेत देशातील सर्वात स्वस्त CNG Cars

  ही वेबसाइट सेंट्रल डेटाशी जोडलेली असेल आणि देशातील कोणत्याही राज्यात अशा वाहनांची माहिती मिळेल. इथे हायटेक मशीन्सद्वारे बॉडी, चेसी, व्हील्स, टायर्स, ब्रेकिंग आणि स्टीयरिंगसह लाइटसारख्या अनेक भाग तपासले जातील.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Vehicles

  पुढील बातम्या