मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जर 'हे' 7 अ‍ॅप वापरत असाल तर सावधान! ऑनलाइन लीक झाला 2 कोटी युझरचा डेटा

जर 'हे' 7 अ‍ॅप वापरत असाल तर सावधान! ऑनलाइन लीक झाला 2 कोटी युझरचा डेटा

या 2 कोटी युझरचा डेटा एकूण 1.2TB च्या डेटासह ऑनलाइन लीक झाला आहे. जाणून घ्या कोणते आहेत हे 7 VPN अ‍ॅप

या 2 कोटी युझरचा डेटा एकूण 1.2TB च्या डेटासह ऑनलाइन लीक झाला आहे. जाणून घ्या कोणते आहेत हे 7 VPN अ‍ॅप

या 2 कोटी युझरचा डेटा एकूण 1.2TB च्या डेटासह ऑनलाइन लीक झाला आहे. जाणून घ्या कोणते आहेत हे 7 VPN अ‍ॅप

  • Published by:  Priyanka Gawde

डेटा लीक (data leak) होण्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. आता एका रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, VPN सेवा जेवढी सुरक्षित वाटत होती, तेवढी नाही आहे. हाँगकाँगच्या 7 VPN प्रोव्हायडर युझरचा डेटा ऑनलाइन लिक झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही VPN वापरत असाल तर काळजी घ्या. कारण या 7 VPN अ‍ॅपच्या सुमारे 2 कोटी युझरचा डेटा लिक झाला आहे.

या VPN सेवांचा असा दावा आहे की जगभरात त्यांचे 2 कोटी युझर आहेत. रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, या 2 कोटी युझरचा डेटा एकूण 1.2TB च्या डेटासह ऑनलाइन लीक झाला आहे. जाणून घ्या कोणते आहेत हे 7 VPN अ‍ॅप...

>>UFO VPN

>>FAST VPN

>>Free VPN

>>Super VPN

>>Flash VPN

>> Secure VPN

>>Rabbit VPN

वाचा-Gmail, Amazon सारखे 377 अ‍ॅप हॅक, पासवर्ड, क्रेडिट कार्डची माहितीची चोरी

vpnMentorची रिसर्च टीमने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हंटले आहे की, VPN सेवा देणारी कंपनी पर्सनली आयडेंटिफायबल इन्फॉर्मेशन (PII) डेटा अ‍ॅप्सवरून लीक झाली आहे, तर VPN सेवेची ऑफर देणारी कंपनीने दावा केला आहे की, असा कोणताही डेटा लीक झालेला नाही आहे.

यापैकी बर्‍याच अ‍ॅप्सचा दावा आहे की ते ‘no-log VPNs’ ऑफर करतात, ज्याचा अर्थ असा आहे की ते त्यांच्या नेटवर्कवरील कोणत्याही युझरच्या कामाचे किंवा सर्चचे रेकॉर्ड ठेवू शकत नाही. मात्र हे अ‍ॅप्स गुप्तपणे सर्व माहिती रेकॉर्ड करत असल्याचे आता समोर आले आहे.

वाचा-WhatsApp हॅक होण्यापासून वाचवायचे आहे? मग लगेच करा Settings मध्ये 'हे' बदल

या अ‍ॅप्सचे रेटिंग 4.9 आहे

धक्कादायक बाब म्हणजे या VPN मधील काही अ‍ॅप्स बरेच लोकप्रिय आहेत आणि त्यांना गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअरवर चांगले रेटिंग मिळाले आहेत. यापैकी हाँगकाँगची सुपर VPNs कंपनी Nownetmobi ला प्ले-स्टोअरवर 4.6 आणि अ‍ॅपल स्टोअरवर 4.9 रेटिंग आहे. हाँगकाँगच्या दुसर्‍या UFO VPN च्या Dreamfii HK लिमिटेडला देखील गुगल प्ले स्टोअरवर 4.5 आणि अ‍ॅपल स्टोअरवर 4.8 रेटिंग आहे.

First published: