प्रत्येक 10 पैकी 7 शहरी भारतीय खेळतात मोबाईल गेम्स; टॉप 10 गेमिंग देशांमध्ये भारताचा समावेश

प्रत्येक 10 पैकी 7 शहरी भारतीय खेळतात मोबाईल गेम्स; टॉप 10 गेमिंग देशांमध्ये भारताचा समावेश

भारतीय गेमिंग जनसंख्येमध्ये 82 टक्के लोक एका आठवड्यात 10 तास गेम खेळतात. त्याशिवाय 16 टक्के लोक सर्वाधिक गेम खेळतात आणि ते 10 तासांहून अधिक गेम खेळतात. भारतातील गेमर्सची टक्केवारी अमेरिका (71 टक्के) आणि ऑस्ट्रेलियाच्या (72 टक्के) बरोबरीने आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : मोबाईल गेमर्सने पीसी किंवा कंसोल गेमर्सला मागे टाकलं आहे. केवळ 12 टक्के भारतीय कंसोलवर गेम खेळतात. तर 67 टक्के लोक स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा वापर करतात. 10 पैकी 7 व्हिडिओ गेम किंवा मोबाईल गेम खेळणाऱ्या शहरी भारतीयांनी देशाला पहिल्या टॉप 10 गेमिंग देशात पोहचवलं आहे, गुरूवारी एका नव्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

भारतीय गेमिंग जनसंख्येमध्ये 82 टक्के लोक एका आठवड्यात 10 तास गेम खेळतात. त्याशिवाय 16 टक्के लोक सर्वाधिक गेम खेळतात आणि ते 10 तासांहून अधिक गेम खेळतात. YouGov eGaming आणि Esports: The Next Generation नुसार, भारतात ऑनलाईन गेमिंग उद्योग एक वेगाने वाढणारा व्यवसाय आहे, जो स्पर्धात्मक खेळ आणि व्यावसायिक गेमिंगमध्ये विकसित होत आहे. भारतात सक्रिय गेमर्स, गेमिंग आणि ईस्पोर्ट्स उद्योगात येणाऱ्या काही वर्षात वाढ होणार आहे.

(वाचा - सतत 2 वर्ष घेत होती ड्रग्स, अशी झाली अवस्था; पण 4 महिन्यात बदललं अख्खं आयुष्य)

भारताचा जगातील 10 गेमिंग देशांत समावेश -

24 करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये, भारत आता जगातील पहिल्या 10 गेमिंग देशांमध्ये सामिल आहे. YouGov च्या ईस्पोर्ट्स आणि गेमिंगच्या ग्लोबल सेक्टर हेड निकोल पाइकने सांगितलं की, गेमिंग इकोसिस्टममध्ये गोष्टी किती वेगाने बदलतात हे समोर आलं आहे. यामुळे जाहीरातदार आणि प्रायोजकांसाठी हे समजणं कठीण होतंय की, कधी आणि कसे e आणि गेमिंगसाठी खर्च करावे.

(वाचा - ना सचिन, ना विराट; केवळ 'या' एका भारतीय खेळाडूला फॉलो करतं instagram)

यूट्यूब -

भारतातील गेमर्सची टक्केवारी अमेरिका (71 टक्के) आणि ऑस्ट्रेलियाच्या (72 टक्के) बरोबरीने आहे. गेम खेळण्याशिवाय ते यूट्यूबवर पाहणं हाही एक नवा ट्रेंड आला आहे. यूट्यूबवर अनेक गेम्स प्रसिद्ध आहेत. यूट्यूब गेमिंगमध्ये भारत जागरुकतेच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऍन्गेजमेंटच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. फेसबुक, ट्विटरवरही गेमिंग प्रसिद्ध आहे. पण तेथील संख्या 12-12 टक्के आहे. रिपोर्टनुसार, भारतीय या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची मोठी शक्यता आहे. याबाबत भारतीयांमध्ये माहिती पसरल्यास ईस्पोर्ट्सचं भविष्य देशात उज्जल होऊ शकतं.

Published by: Karishma Bhurke
First published: November 15, 2020, 10:08 AM IST
Tags: video game

ताज्या बातम्या