• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • या वर्षापर्यंत 6G technology लाँच करण्याचं लक्ष्य, केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांची माहिती

या वर्षापर्यंत 6G technology लाँच करण्याचं लक्ष्य, केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांची माहिती

'6G तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. हे तंत्रज्ञान आपल्याच देशात तयार करण्यात येईल. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जी काही आवश्यक उपकरणं असतील, ती भारतातच तयार केली जातील'

  • Share this:
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : 'भारत (India) 6G तंत्रज्ञानाच्या (6G technology) बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला देशात 6G तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे,' अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी दिली. '6G तंत्रज्ञान विकसित ( developing) करण्याच्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. हे तंत्रज्ञान आपल्याच देशात तयार करण्यात येईल. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जी काही आवश्यक उपकरणं असतील, ती भारतातच तयार केली जातील,' असंही वैष्णव यांनी सांगितलं. '2023 किंवा 2024 मध्ये हे तंत्रज्ञान तयार होईल. भारतात 6G तंत्रज्ञान सुरू केल्यानंतर आम्ही ते जगभर वितरित ( distribute) करू,' असंही ते म्हणाले. दरम्यान, 4G, 5G मुळे इंटरनेट जगताचा विकासाचा वेग ज्याप्रकारे बदलला आहे, त्यावरून हे स्पष्ट आहे, की 6G आल्यानंतर पुन्हा एकदा इंटरनेट जगतात मोठा बदल होणार आहे.

Google Play Store वर Joker Malware ची एन्ट्री, ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 ॲप्स

6G विकासावर काम सुरू - केंद्रीय मंत्री म्हणाले, '6G तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम आधीच सुरू झालं आहे. आम्ही टेलिकॉम सॉफ्टवेअर, इंडिया मेड टेलिकॉम इक्विपमेंट्स भारतात नेटवर्क चालवण्यासाठी डिझाइन केली आहेत. त्यांचं जागतिकीकरण केलं जाऊ शकतं. याचाच अर्थ इतर देशांनादेखील ते देता येईल.' फायनान्शियल टाइम्स आणि द इंडियन एक्स्प्रेस यांनी आयोजित केलेल्या 'न्यू टेक्नॉलॉजी अँड द ग्रीन इकॉनॉमी : टू ट्रेंड्स शेपिंग ए न्यू इंडिया' या ऑनलाइन अजेंडा-सेटिंग वेबिनारच्या चौथ्या मालिकेत वैष्णव बोलत होते. ते म्हणाले, 'या टेक्नॉलॉजीसाठी आवश्यक परवानग्या आधीच देण्यात आल्या आहेत. आमचे शास्त्रज्ञ आणि अभियंते त्यावर काम करत आहेत.'

Amazon Prime युजर्सला मोठा फटका; मेंबरशिपसाठी द्यावे लागणार 50 टक्के अधिक पैसे

5G लाँच करण्याची तयारी - केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असंही सांगितलं, 'केवळ 6G टेक्नॉलॉजीवर काम केलं जात नाहीये, तर भारत स्वत: स्वदेशी 5G लाँच करण्याच्याही तयारीत आहे. पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाऊ शकते. यासाठी ट्रायशी संपर्क साधण्यात आला आहे. ट्राय यासाठी सूचना-हरकती स्वीकारण्याचं काम करत आहे. ते काम पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.'
First published: