मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवं जीवन मिळण्याच्या आशेने गोठवले 600 जणांचे मृतदेह; भारतातही उभारली गेली आहे क्रायोनिक्स प्रयोगशाळा

नवं जीवन मिळण्याच्या आशेने गोठवले 600 जणांचे मृतदेह; भारतातही उभारली गेली आहे क्रायोनिक्स प्रयोगशाळा

 क्रायोनिक्स तंत्रज्ञान

क्रायोनिक्स तंत्रज्ञान

विकासाच्या वाटेवर अजून तितकी प्रगती झालेली नाही की मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करता येईल. ही गोष्ट सध्या अशक्य वाटत असली तरी एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत करता येईल, असा दावा काही कंपन्या करत आहेत. या तंत्राला क्रायोनिक्स असं नाव देण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, ०1 डिसेंबर : जगभरात रोज नवनवीन गोष्टींवर संशोधन होत आहे. या संशोधनाचे निष्कर्ष सामान्य व्यक्तींनाच नव्हे, तर शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित करत असतात. विज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत आहे; पण विकासाच्या वाटेवर अजून तितकी प्रगती झालेली नाही की मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करता येईल. या गोष्टीवर विज्ञानही आपला पराभव स्वीकारतं. अर्थात, ही गोष्ट सध्या अशक्य वाटत असली तरी एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत करता येईल, असा दावा काही कंपन्या करत आहेत. त्यासाठी मृतदेह दीर्घ काळ गोठवावे म्हणजेच फ्रीज करावे लागतील. या तंत्राला क्रायोनिक्स असं नाव देण्यात आलं आहे.

मृत्यू झालेल्या व्यक्ती केवळ बेशुद्ध पडल्या आहेत, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. क्रायोनिक्स तंत्राच्या मदतीने मृतांना पुन्हा जिवंत करता येऊ शकतं, असा दावा काही जणांनी केला आहे. अशा परिस्थितीत, एखादी व्यक्ती पुन्हा जिवंत होईल या अपेक्षेने तिचा मृतदेह गोठवून सुरक्षित ठेवण्याकडे झपाट्याने कल वाढत आहे. आतापर्यंत जगभरातल्या 600 जणांचे मृतदेह क्रायोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे फ्रीज केले गेले आहेत. अमेरिका आणि रशियामध्ये सर्वाधिक 300 जणांचे मृतदेह गोठवले गेले आहेत. जगभरातले अनेक नागरिक अखेरची इच्छा म्हणून आपलं शरीर क्रायोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षित ठेवावं, असं त्यांच्या कुटुंबीयांना सांगत आहेत.

हेही वाचा - तुम्हीही फोनचं ब्ल्यूटूथ कायम ऑन ठेवता? मग असं राहा ब्लूबगिंगपासून सुरक्षित

क्रायोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे काय?

'आम्ही उणे 200 अंश सेल्सिअस तापमानात मानवी मृतदेह सुरक्षित ठेवू. मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याचं काही तंत्र भविष्यात आले तर हे मृतदेह बाहेर काढून पुन्हा जिवंत केले जातील,' असा दावा सदर्न क्रायोनिक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने काही काळापूर्वी केला होता. सध्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणसाला पुन्हा जिवंत करण्याची कोणतीही पद्धत विकसित झालेली नाही. अशा परिस्थितीत भविष्यात मृतांना जिवंत करण्यासाठी काही तरी तंत्र विकसित होईल आणि त्यांना नवीन जन्म मिळेल या आशेने माणसांची शरीरं गोठवली जात आहेत, असं अमेरिकी शास्त्रज्ञ डॉ. आर. गिब्सन यांनी स्पष्ट केलं.

खासगी प्रयोगशाळा आहेत कुठे?

केवळ अमेरिका आणि रशियाच नाही, तर भारत आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये नवीन खासगी कंपन्यांनी क्रायोनिक्स तंत्रज्ञानाने सुसज्ज प्रयोगशाळा उभारल्या आहेत. मृतदेह गोठवून सुरक्षित ठेवण्यासाठी भारतात कोणताही स्पष्ट कायदा नाही. काही वर्षांपूर्वी एका संताचा मृतदेह गोठवून सुरक्षित ठेवण्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. भारतात मृतदेह गोठवण्यास न्यायालयाकडून परवानगी मिळणं फार कठीण आहे. तथापि, 2016मध्ये एका कॅन्सरग्रस्त तरुण मुलीने लंडन उच्च न्यायालयात एक अपील दाखल केलं होतं. 'माझा मृत्यू होणार आहे. त्यामुळे मला पुन्हा जगण्याचा हक्क मिळायला हवा,' अशी या तरुण मुलीची मागणी होती. आगामी काळात मृतांना जिवंत करण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल आणि आपल्या मुलीला नवजीवन मिळेल, असा विश्वास तिच्या कुटुंबीयांना होता.

किती खर्च येतो?

या गोष्टीला नेमका किती खर्च येईल, असा प्रश्न नक्कीच मनात आला असेल. ग्राहकांना आपला मृतदेह गोठवून सुरक्षित ठेवण्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागते. वास्तविक, मृतदेह द्रव नायट्रोजनमध्ये उणे 200 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या एका स्टीलच्या चेंबरमध्ये बंद करून ठेवला जातो. सदर्न क्रायोनिक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह स्टील चेंबरमध्ये उलटा ठेवला जातो. चेंबरमध्ये गळती झाली तर अशा वेळी मेंदू सुरक्षित राहण्यासाठी तसं केलं जातं. मृत्यू ही एक क्रमबद्ध प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचं मृत शरीर शक्य तितक्या लवकर गोठवलं गेलं तर ते पुनरुज्जीवीत होण्याची आशा वाढते, असा विश्वास कंपनीला वाटतो.

First published:

Tags: Health, Technology