5G नेटवर्कमुळे तुमच्या आयुष्यात होणार 'हे' बदल

5G नेटवर्कमुळे तुमच्या आयुष्यात होणार 'हे' बदल

लेटेन्सी लाईफसाठी व्हा सज्ज, एकाच वेळी इंटरनेटला अनेक उपकरणं जोडणं आता होणार शक्य.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर: 21वं शतक संगणकीय युग म्हणून ओळखलं जातं. इतरांप्रमाणेच इथे स्पर्धा आहे ती नेटवर्क आणि स्पीडमध्ये. वेळेइतकच वेगाला महत्त्व आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच मोठा बदल घडणार आहे. 2G, 3G, 4G नंतर आता सगळ्यात सुपरफास्ट असणारं 5G लवकरच भारतात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 5G  सेवेमुळे मशिनरीचा अगदी दूरवरून वापर करता येणं शक्य होणार आहे. परिणामी डॉक्टर लांब असूनही सर्जरी करू शकतील. इतकंच नव्हे तर सेल्फ ड्रायवही करता येऊ शकतं. वाहनांमध्येही याचा अचूकरित्या वापर होऊ शकेल.

आपल्या देशात सध्या 4 जी सेवा वापरली जात आहे. मात्र आता 5G ची चर्चा सुरू झाली आहे. 5Gच्या येण्यानं आयुष्यात मोठे बदल घडून येतील. मेसेज रिसिव्हरवर पोहोचेपर्यंत खूप कमी वेळ लागेल. कमी स्पीडमुळे अशक्य असलेल्या गोष्टी शक्य होतील. ह्यालाच तांत्रिक भाषेत लेटेन्सी म्हणतात. ह्याचा उपयोग सेल्फ ड्रायव्हिंग वाहनांमध्ये अचूकरीत्या होईल. वेग कधी कमी करावा, केव्हा वाहन वळवावे, केव्हा ब्रेक मारावा या क्रिया रियल टाइम मध्ये घडतील.

5G सेवेचा AR आणि VR क्षेत्रातही चांगला उपयोग होईल. तुम्ही घरबसल्या एक लाईव्ह इव्हेंट VR बॉक्स वापरून अटेंड करू शकाल. अगदी समोर लाईव्ह दृश्य घडत आहेत असा अनुभव घेता येईल. इतकंच नव्हे तर रिमोट सर्जरी शक्य होऊन डॉक्टर लांब असून सुद्धा शस्त्रक्रिया करू शकतील. अर्थात 5G सेवा भारतात यायला अजून तसा काही कालावधी जावा लागेल. पुढील तीन वर्षात 5G  सेवा सुरू होऊ शकेल. कारण 5G चं जाळं बसवणं खर्चिक आहे. प्रत्येक 300 मीटरवर 5G चा रिसिव्हर बसवावा लागेल. कारण 5Gच्या वेव्हस जास्त अंतरापर्यंत प्रवास करू शकत नाहीत. हे छोट व्हेव्स असतात त्यामुळे तुटण्याचा धोका असतो. असं असलं तरी अनेक कंपन्या त्यांची 5G सेवा भारतात आणण्यासाठी उत्सुक आहेत. कारण भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्मार्टफोन, आणि लॅपटॉप उपभोक्ता असलेला देश आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 6, 2019, 7:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading