नवी दिल्ली, 26 मार्च : फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्रामवर (Instagram) फ्रॉडची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. इन्स्टाग्रामने आपल्या प्लॅटफॉर्मवर फ्रॉड प्रकरणात मोठी वाढ झाल्याचं सांगितलं असून कोरोना काळात फसवणूकीच्या प्रकरणांत 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे.
सायबरसिटी फर्म सोफोस सिक्योरिटीने दिलेल्या माहितीनुसार, मागील एका वर्षात इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात स्कॅमिंग झालं आहे. रिसर्चर्सने सांगितलं की, फिशर्स युजर्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात किंवा इन्स्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज करुन किंवा ईमेलद्वारे, जिथे युजर्सला बनावट लॉग-इन पेजवर आपलं युजर नेम आणि पासवर्ड टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
ज्यावेळी फ्रॉड करणारे, युजर्सचे लॉग-इन डिटेल्स मिळवतात, त्यावेळी ते युजर्सच्या पर्सनल माहितीपर्यंत पोहचतात. एवढंच नाही, तर फ्रॉड करणारे युजर्सचा पासवर्ड बदलून युजरलाच अकाउंटच्या बाहेर करतात.
रिपोर्टनुसार, हे स्कॅमर्स अर्थात फ्रॉड करणारे, एक मोठा ब्रँड असल्याचा दिखावा करतात आणि फसवणूक करणाऱ्याला एका जाहिरात कराराची ऑफर देतात. जर पीडित व्यक्तीला ही ऑफर वैध नाही असं वाटलं, तर स्कॅमर्स युजरला पेमेंट करण्यासाठी स्वत:चे पर्सनल बँकिंग तपशील देतात.
2010 मध्ये इन्स्टाग्राम लाँच झाल्यानंतर, आतापर्यंत इन्स्टावर 1 अब्जाहून अधिक अकाउंट सुरू करण्यात आले आहेत. तसंच या प्लॅटफॉर्मवर दररोज जवळपास 10 कोटी फोटो शेअर केले जातात. इन्स्टावर बनावट प्रेम प्रकरणांची मोठी संख्या आहे. फ्रॉड करणारे एका खोट्या ऑनलाईन रिलेशनशिपमध्ये प्रवेश करतात आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी अनेक आठवडे, महिने, वर्षभर आमिष दाखवतात, त्यानंतर एकदा विश्वास संपादन झाल्यानंतर या विश्वासाचा गैरवापर केला जातो. एकदा टार्गेट ठरल्यानंतर स्कॅमर्स व्हिजा, फ्लाईट, प्रवासासाठीचा खर्च आणि इतर काही बाबींसाठी पैसे मागण्यास सुरुवात करतात.
रिसर्चर्सने सांगितलं की, इन्स्टाग्रामवर इतर साईट्सवर जो पासवर्ड टाकला आहे, तोच इन्स्टावर टाकू नका. प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा पासवर्ड ठेवा. तसंच कोणालाही आपले डिटेल्स देऊ नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Financial fraud, Instagram, Instagram post, Online fraud