मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /50 MP कॅमेरा, दोन स्क्रीनसह Xiaomi चा प्रीमियम स्मार्टफोन लाँच; स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा किंमत आणि फीचर्स

50 MP कॅमेरा, दोन स्क्रीनसह Xiaomi चा प्रीमियम स्मार्टफोन लाँच; स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा किंमत आणि फीचर्स

शाओमीच्या (Xiaomi) Mi 11 ultra या Mi 11 सीरिजच्या सर्वांत महाग आणि प्रीमियम स्मार्टफोनची (Premium Smartphone) मोठी चर्चा होती. हा फोन आज Mi.com वर दुपारी 12 वाजता प्रथमच सेलद्वारे उपलब्ध करण्यात आला आहे.

शाओमीच्या (Xiaomi) Mi 11 ultra या Mi 11 सीरिजच्या सर्वांत महाग आणि प्रीमियम स्मार्टफोनची (Premium Smartphone) मोठी चर्चा होती. हा फोन आज Mi.com वर दुपारी 12 वाजता प्रथमच सेलद्वारे उपलब्ध करण्यात आला आहे.

शाओमीच्या (Xiaomi) Mi 11 ultra या Mi 11 सीरिजच्या सर्वांत महाग आणि प्रीमियम स्मार्टफोनची (Premium Smartphone) मोठी चर्चा होती. हा फोन आज Mi.com वर दुपारी 12 वाजता प्रथमच सेलद्वारे उपलब्ध करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 7 जुलै: शाओमीच्या (Xiaomi) Mi 11 ultra या Mi 11 सीरिजच्या सर्वांत महाग आणि प्रीमियम स्मार्टफोनची (Premium Smartphone) मोठी चर्चा होती. हा फोन आज Mi.com वर दुपारी 12 वाजता प्रथमच सेलद्वारे उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या सेलमध्ये मर्यादित स्मार्टफोन्सच उपलब्ध असतील, असं शाओमी इंडियाचे जागतिक उपाध्यक्ष (Global VP) आणि व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार यांनी सांगितलं. शाओमीच्या Mi 11 ultra या स्मार्टफोनच्या 12GB RAM+256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे. हा फोन खरेदी करताना युजर्सनी SBI क्रेडिट कार्ड वापरलं, तर त्यांना 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट (Instant Discount) दिला जाणार आहे.

    Mi 11 Ultra या फोनला 6.8 इंची 120Hz OLED डिस्प्ले (Display) देण्यात आला आहे. त्याचं रिझॉल्युशन 2K आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आहे. हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज क्षमतेसह लाँच करण्यात आला आहे.

    (वाचा - 6000 mAh बॅटरीसह सॅमसंगचा दमदार आणि स्वस्त स्मार्टफोन लॉन्च)

    फोनच्या मागच्या बाजूलाही स्क्रीन -

    Mi 11 Ultra या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मागच्या बाजूलाही 1.1 इंची एक छोटी स्क्रीन आहे. त्या स्क्रीनलाही OLED पॅनेल आहे. सेल्फी साठी व्ह्यू फाइंडर (View Finder) म्हणून युजर्स या स्क्रीनचा वापर करू शकतात. तसंच हा डिस्प्ले ऑल्वेज ऑन अर्थात कायम सुरू राहणारा आहे. त्यावर घड्याळ दिसेल, तसंच नोटिफिकेशन्सही मिळतील.

    या स्मार्टफोनमध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा कॅमेरा बम्प आहे. या फोनच्या पाठीमागच्या बाजूला तीन कॅमेरा सेटअप (3 camera setup) देण्यात आला आहे. त्यात 50 मेगापिक्सेलची प्रायमरी लेन्स (Primary Lens) आहे. त्याशिवाय 48 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 5x पेरिस्कोप लेन्सही देण्यात आली आहे.

    (वाचा - Realme च्या या फोनवर मिळतोय तब्बल 17000 रुपयांचा डिस्काउंट;पाहा काय आहे बंपर ऑफर)

    Mi 11 Ultra च्या बॅटरीची (Battery Power) क्षमता 5,000mAh एवढी आहे. या बॅटरीला फास्ट चार्जिंग सपोर्ट (Fast Charging support) देण्यात आला असून, तो 67W चा आहे. या फोनमध्ये रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचा (Reverse Wireless Charging) सपोर्टही देण्यात आला आहे. तो 10W चा आहे. म्हणजेच याद्वारे तुम्ही दुसरा वायरलेस चार्जिंगचा फोनही चार्ज करू शकता. फोनच्या बॉक्समध्ये मात्र 55W क्षमतेचा फास्ट चार्जर मिळतो.

    First published:

    Tags: Smartphone, Xiaomi