7 लाख रुपयांहून कमी किंमतीत लाँच होणार या 5 जबरदस्त कार; जाणून घ्या किती द्यावा लागेल EMI

7 लाख रुपयांहून कमी किंमतीत लाँच होणार या 5 जबरदस्त कार; जाणून घ्या किती द्यावा लागेल EMI

नव्या वर्षात नवीन गाडी (Car) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यंदा दाखल होणाऱ्या या पाच नव्या कार्सचा जरूर विचार करा. या कार्सची किंमत सात लाख रुपयांपेक्षा कमी असून, त्या अत्याधुनिक फीचर्सनी सुसज्ज आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी : नव्या वर्षात नवीन गाडी (Car) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यंदा दाखल होणाऱ्या या पाच नव्या कार्सचा जरूर विचार करा. या कार्सची किंमत सात लाख रुपयांपेक्षा कमी असून, त्या अत्याधुनिक फीचर्सनी सुसज्ज आहेत.

मारुती अल्टो (Maruti ALTO) : मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) मारुती अल्टोची (ALTO) नवी सुधारीत नेक्स्ट जनरेशन आवृत्ती या वर्षी जूनमध्ये दाखल करणार आहे. या कारची किंमत 3 ते 4.5 लाख रुपयांपर्यंत असेल. पेट्रोल आणि सीएनजीवर चालणारी ही कार 23 किलोमीटरपेक्षा अधिक मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. सध्याच्या वाहन कर्जाच्या दरानुसार, दरमहा 5 हजार 57 रुपये देऊन ही कार खरेदी करता येईल. 0.8 लिटर, 1 लिटर पेट्रोल इंजिन आणि सीएनजी प्रकारात ही कार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अल्टो भारतातील सर्वांत लोकप्रिय बजेट कार आहे.

मारुती सेलेरिओ (Maruti Celerio) : मारुती सुझुकी सेलेरिओ (Celerio) या कारचं सेकेंड जनरेशन आहे. या कारची किंमत 5 ते 6.5 लाख रुपयांदरम्यान असू शकते. ही कार केवळ पेट्रोल इंजिन प्रकारात दाखल करण्याचा कंपनीचा विचार असून, ती 23 किलोमीटर मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक कार गियरबॉक्सच्या पर्यायासह, 1.0 आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिन प्रकारात ही कार उपलब्ध होईल. सध्याच्या 9.5 टक्के दरानं 8288 रुपये दरमहा हप्त्यानं कार खरेदी करता येऊ शकते.

(वाचा - Driving Licence काढण्याच्या नियमांमध्ये बदल; केवळ याच पद्धतीने अर्ज करता येणार)

टाटा एचबीएक्स (Tata HBX) : टाटा मोटर्स (Tata Motors) यंदा आपली लहान एसयूव्ही (Micro SUV) दाखल करणार आहे. जून किंवा जुलैमध्ये टाटा एचबीएक्स (Tata HBX) 5 ते 7 लाख रुपये किमतीची मायक्रो एसयूव्ही दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असलेली ही कार प्रती लिटर 19 लिटर मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. 2020 मधील ऑटो एक्स्पोमध्ये या कारची झलक दाखवण्यात आली होती.

(वाचा - TATA ची कार महागणार! तब्बल 26 हजारांनी होणार वाढ; जाणून घ्या संपूर्ण माहिती)

रेनो किगर (Renault Kiger) : रेनॉ (Renault) आपली बहुप्रतीक्षित किगर (Kiger) ही कार मार्चमध्ये दाखल करेल. या कारची किंमत सहा लाख रुपयांपासून सुरू होईल, तर टॉप एंड मॉडेल 9.5 लाख रुपये किंमतीत उपलब्ध होईल. दरमहा 9 हजार 117 रुपयांच्या हप्त्यावर ही कार खरेदी करता येईल. 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह 1.0 लिटर क्षमतेचे टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असलेली ही कार प्रती लिटर 20 किलोमीटर मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे.

सिट्रॉन सब 4 मीटर एसयूव्ही (Citroen sub-4M SUV) : फ्रान्समधील (France) कार कंपनी सिट्रॉन (Citron) प्रथमच भारतात प्रवेश करत असून, ती आपली पहिलीच कार सब 4 मीटर एसयूव्ही दाखल करणार आहे. या वर्षाच्या अखेरीस ही कार दाखल होण्याची शक्यता असून, तिचं बेसिक मॉडेल सहा लाख रुपये किंमतीत, तर टॉप एंड मॉडेल 9 लाख रुपये किंमतीत उपलब्ध होईल. 9946 रुपयांच्या हप्त्यावर कार खरेदी करता येईल. या कारमध्ये 1.2 लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन असेल. ही कार 15 किलोमीटर मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 28, 2021, 7:47 PM IST

ताज्या बातम्या