Home /News /technology /

50 लाखांची लॉटरी लागल्याचं सांगत 37 लाख रुपयांचा गंडा, बक्षिसासाठी व्यक्तीने घर-दारही विकलं

50 लाखांची लॉटरी लागल्याचं सांगत 37 लाख रुपयांचा गंडा, बक्षिसासाठी व्यक्तीने घर-दारही विकलं

दोन फ्रॉडस्टर्सनी एका व्यक्तीला 50 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचं सांगत, तब्बल 37 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मुलाच्या किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांनी लॉटरीचे पैसे मिळतील, या आशेने घर-दार विकलं. परंतु काही दिवसांत आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

पुढे वाचा ...
  पटणा, 13 सप्टेंबर : कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशीच आणखी एक घटना समोर आली असून दोन फ्रॉडस्टर्सनी एका व्यक्तीला 50 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचं सांगत, तब्बल 37 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मुलाच्या किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांनी लॉटरीचे पैसे मिळतील, या आशेने घर-दार विकलं. परंतु काही दिवसांत आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी गोविंदा यांच्या मुलाच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आहेत. त्यामुळे मुलाच्या उपचारासाठी पैशांबाबत ते चिंतेत होते. डॉक्टरांनी त्यांना मुलाच्या किडनी लवकरात लवकर ट्रान्सप्लान्ट करण्यासाठी सांगितलं. परंतु पैशांच्या अभावामुळे ते किडनी ट्रान्सप्लान्ट करू शकत नव्हते. याचदरम्यान त्यांना उदय ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडमधून एक कॉल आला. ज्यात त्यांना फर्स्ट प्राइज रुपात 50 लाख 8 हजार रुपये ऑफर दिली गेली. कंपनीकडून आजारी मुलाच्या संबंधित डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीसह इतरही कागदपत्र आणि फोटोची मागणी केली. मुलाच्या आजारपणामुळे वडिलांनी कंपनीने जसं सांगितलं, तशा सर्व गोष्टी केल्या. कंपनीने त्यांना एका व्हॉट्सअॅप नंबरवर संपूर्ण कागदपत्र पाठवण्यास सांगितली. त्यानंतर कंपनीकडून बक्षिसाची रक्कम घेण्यासाठी रजिस्ट्रेशन चार्जची मागणी केली. गोविंदा यांनी 5 डिसेंबर 2017 रोजी रजिस्ट्रेशन चार्ज रुपात 9 हजार 200 रुपये एका व्यक्तीच्या अकाउंटमध्ये सांगितल्याप्रमाणे जमा केले. त्यानंतर कंपनीने विविध व्यक्तींच्या नावे अनेक अकाउंटमध्ये पैशांची मागणी केली. जवळपास 55 खात्यांमध्ये एकूण 37 लाख रुपये मागवण्यात आले. पीडित व्यक्तीने कंपनीत आतापर्यंत एकूण 37 लाख 33 हजार 911 रूपये जमा केले आहेत.

  Customer Careच्या नावाखाली असा होतो Online Fraud,हे अ‍ॅप चुकूनही डाउनलोड करू नका

  इतकी मोठी रक्कम पीडित व्यक्तीने जमीन, दागिने, गाडी विकून त्या अकाउंट्समध्ये जमा केली. या फसवणुकीदरम्यान त्यांच्या मुलाचे उपचारही बंद झाले. याप्रकरणी 10 ऑक्टोबर 2018 रोजी पोलिसांनी तक्रार घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान 55 खात्यांपैकी दोघांना शोधण्यात पोलिसांना यश आलं. बंगालमध्ये राहणाऱ्या या दोन लोकांनी मिळून बिहारमधील या व्यक्तीला मोठा गंडा घातला. अशा प्रकारच्या फसवणुकीने पोलीसही हैराण झाले.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या