Paytm युजर्ससाठी मोठी बातमी; आता ही सेवा 24 तास उपलब्ध

पेटीएमची सेवा वापरणाऱ्या सर्व लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना याचा फायदा होईल. रिझर्व्ह बँकेनं सेवेला परवानगी दिल्याने याचा लाभ देशातील उद्योगक्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल.

पेटीएमची सेवा वापरणाऱ्या सर्व लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना याचा फायदा होईल. रिझर्व्ह बँकेनं सेवेला परवानगी दिल्याने याचा लाभ देशातील उद्योगक्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 डिसेंबर : देशातील एक सर्वांत मोठी फिनटेक (Fintech) कंपनी पेटीएमने (Paytm) व्यावसायिकांना मोठ्या रकमेचे व्यवहार सहजतेनं करता यावेत यासाठी 24 तास आरटीजीएस (Real-time gross settlement -RTGS) सेवा उपलब्ध करुन दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 14 डिसेंबरपासून आरटीजीएस (RTGS) व्यवहारांना आठवड्यातील सातही दिवस 24 तास परवानगी दिल्यानंतर कंपनीनं लगेचच ही सेवा सुरू केली आहे. आता आठवड्याचे सातही दिवस आणि 24 तास पेटीएम युजर्सना ही सेवा उपलब्ध आहे. दोन लाखांपेक्षा जास्त रकम ट्रान्स्फर करण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फर सेवा म्हणजे आरटीजीएस (RTGS). पेटीएमची सेवा वापरणाऱ्या सर्व लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना याचा फायदा होईल. अनेक कंपन्या पैसे हस्तांतरीत करण्यासाठी आता ऑटोमेटेड पेमेंट यंत्रणेचा वापर करतात. त्यामुळे वेळ आणि पैशाची ही बचत होते. पेटीएमतर्फे अगदी काही क्षणात बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करणं शक्य होतं. रिझर्व्ह बँकेनं अखंड ‘आरटीजीएस’ सेवेला परवानगी दिल्याने याचा लाभ देशातील उद्योगक्षेत्राला (Businesses)मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल.

  (वाचा - जितकी गाडी चालवाल, तितकाच प्रीमिअम भरा; ड्रायव्हिंगसाठी नवी INSURANCE POLICY)

  पेटीएम वॉलेट, युपीआय (UPI), आयएमपीएस (IMPS), एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएस (RTGS) अशा सर्व सुविधांद्वारे अखंड 24 तास पैसे हस्तांतरीत करण्याची सेवा देणारी पेटीएम (Paytm) ही एकमेव कंपनी आहे. या सेवेमुळे कंपन्यांना आपल्या रोख रकमेचा ओघ अधिक प्रभावीपणे वापरण्यात मदत होईल, असं पेटीएमने म्हटलं आहे. या आरटीजीएस सेवेसाठी किमान मर्यादा 2 लाख रुपयांची असून, कमाल मर्यादा नाही. एनईएफटीद्वारे केवळ दोन लाख रुपयांपर्यंतच पैसे ट्रान्स्फर करता येत होते. आरटीजीएसची सुविधा बँकामध्ये उपलब्ध असली, तरी त्याला वेळेची मर्यादा असल्याने उद्योग, व्यवसायांना ते अडचणीचं ठरत असे. आता 24 तास ही सेवा उपलब्ध झाल्याने उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

  (वाचा - ही इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठी चार्जिंगची गरज नाही; 24 तासात गाड्या सोल्ड आउट)

  त्यामुळे उद्योग, व्यावसायिकांना मोठ्या रकमेचे व्यवहार सहज करता येतील. यामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशीही पाठवता येतील. अगदी रविवार किंवा सुटीचा वार असला तरी. त्यामुळे त्यांच्याकडील खेळत्या भांडवलाचा ओघ टिकवून ठेवणं शक्य होईल. कंपन्या आपल्या ग्राहकांनाही चांगली सेवा देऊ शकतील, कारण त्या केव्हाही त्यांना पैसे ट्रान्सफर करू शकतील. भारतात आरटीजीएस सेवा 24 मार्च 2004 मध्ये सुरू झाली. त्यावेळी केवळ चार बँका ही सेवा देत होत्या. आता 237 बँका ही सेवा देतात. सध्या दररोज साधारण साडे सहा लाख आरटीजीएस व्यवहार होतात, तर त्याद्वारे दररोज 4.17 लाख कोटींचा व्यवहार होतो. आता ही सेवा वर्षाचे सगळे दिवस आणि 24 तास उपलब्ध आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: