पशुपालकांसाठी खूशखबर! गाई-म्हशींसाठी 24×7 हेल्‍पलाईन, सोशल मीडियाद्वारे दूर केल्या जाणार समस्या

कर्नाटक सरकारच्या पशु आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या वतीने ही 24x7 Helpline सुरू करण्यात आली असून, त्याचा पशुपालकांना फायदा होणार आहे. कर्नाटकने या पद्धतीने पशुंसाठी पहिल्यांदा वॉर रूम सुरू केली आहे.

कर्नाटक सरकारच्या पशु आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या वतीने ही 24x7 Helpline सुरू करण्यात आली असून, त्याचा पशुपालकांना फायदा होणार आहे. कर्नाटकने या पद्धतीने पशुंसाठी पहिल्यांदा वॉर रूम सुरू केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 25 जून : सध्याच्या दिवसांत हेल्पलाईन म्हटलं की आपल्याला आठवते कोरोनाची हेल्पलाईन. त्याशिवाय पोलीस, शेतकरी, आरोग्य, चाईल्ड यासंबंधी चालवल्या जाणाऱ्या हेल्पलाईन्स (Helplines)आठवतात. पण जर तुम्हाला सांगितलं, की भारतातलं एक राज्य असं आहे ज्यांनी राज्यातल्या गायी-म्हशींसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. हे राज्य आहे कर्नाटक (Karnataka). कर्नाटक सरकारच्या पशु आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या वतीने ही 24x7 Helpline सुरू करण्यात आली असून, त्याचा पशुपालकांना फायदा होणार आहे. कर्नाटकने या पद्धतीने पशुंसाठी पहिल्यांदा वॉर रूम सुरू केली आहे. टीव्ही 9 ने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी बुधवारी पशु कल्याण या विषयाशी संबंधित पहिल्या वॉररूमचं (First Cow War Room) उद्घाटन केलं. दुग्धोत्पादन, डेअरी उत्पादनं, पशुपालक यांना जनावरांचे आजार, उत्पादन वाढवण्यासाठीची माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. आजार, नैसर्गिक आपत्ती, माणसापासून जनावरांना होणारा त्रास म्हणजे गोहत्येसारख्या कृत्यांपासून जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठीही या हेल्पलाईनचा उपयोग होईल. या हेल्पलाईनवर फोन केल्यास सरकारी यंत्रणांना यासंबंधी माहिती मिळेल. कर्नाटकच्या पशु संवर्धन आणि आरोग्य आयुक्तालयाने (CAHVS) ही वॉररूम सुरू केली असून त्यातूनच ही हेल्पलाईन चालवली जाणार आहे. यासाठी 45 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. आठवड्यातील सातही दिवस 24 तास ही हेल्पलाईन सुरू राहील. Google वर ही गोष्ट सर्च करत असाल तर वेळीच व्हा सावध; महिलेची अडीच लाखाची फसवणूक सोशल मीडियाचाही समावेश - या पशु कल्याण हेल्पलाईनमध्ये केवळ टेलिफोन नंबरचाच नाही तर व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम (Social Media) आणि ई-मेल या माध्यमांचाही समावेश करण्यात आला आहे. या सर्व माध्यमांतून लोक प्रश्न विचारू शकतात किंवा सरकारकडे मदत मागू शकतात. या हेल्पलाईनवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांसंबंधीची आकडेवारी विभागाच्या वेबसाईटवर रोज प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय Pensioners च्या खात्यात किती पैसे आले? आता WhatsApp वर मिळेल माहिती या वेळी मुख्यमंत्री येडियुरप्पा (Karnataka Cm Yediyurappa) म्हणाले,‘देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) पशुपालनाचा वाटा मोठा आहे. त्यामुळेच त्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी आम्ही ही हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यातूनच शेतकरी, पशुपालकांना मदत मिळेल.’ कर्नाटकचे पशु संवर्धन मंत्री प्रभू चव्हाण म्हणाले, ‘ सरकारने सुरू केलेल्या या हेल्पलाईनमुळे दूध उत्पादक आणि पशुपालकांच्या अडचणी सोडवल्या जातील आणि त्यांचा व्यवसायही वाढेल.’
First published: