मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Microsoft मध्ये सांगितली मोठी त्रुटी, कंपनीने 20 वर्षीय तरुणीला दिले 22 लाख रुपये

Microsoft मध्ये सांगितली मोठी त्रुटी, कंपनीने 20 वर्षीय तरुणीला दिले 22 लाख रुपये

बक्षिस म्हणून कंपनीकडून 30000 अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 22 लाख रुपये देण्यात आले आहेत.

बक्षिस म्हणून कंपनीकडून 30000 अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 22 लाख रुपये देण्यात आले आहेत.

बक्षिस म्हणून कंपनीकडून 30000 अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 22 लाख रुपये देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली, 28 जून : एका भारतीय तरुणीला Microsoft ने 22 लाख रुपयांहून अधिकचं बक्षिस दिलं आहे. सायबर सिक्योरिटी अ‍ॅनालिस्ट अदिती सिंहला हे बक्षिस देण्यात आलं आहे. Microsoft कडून Azure क्लाउड सिस्टममध्ये त्रुटी शोधून दिल्यानंतर तिला हे बक्षिस मिळालं आहे.

सायबर सिक्योरिटी अ‍ॅनालिस्ट अदिती सिंहने Azure क्लाउडमध्ये एक गंभीर त्रुटी शोधून दिली. या त्रुटीमुळे सायबर अटॅकर्स युजरच्या अकाउंटचा रिमोट अ‍ॅक्सेस घेऊ शकत होते. याबाबतच अदिती सिंहने कंपनीला रिपोर्ट केलं होतं. त्यानंतर मायक्रोसॉफ्टकडून ईमेल पाठवण्यात आला. त्यात बक्षिसाबाबत सांगण्यात आलं होतं. बक्षिस म्हणून कंपनीकडून 30000 अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 22 लाख रुपये देण्याचं मेलमध्ये सांगण्यात आलं.

(वाचा - कोणालाही कळणार नाही काय सर्च केलं; Google Search History साठी असा ठेवा पासवर्ड)

मायक्रोसॉफ्टकडून आलेला मेल अदितीने ट्विटरवर शेअर केला असून त्या मेलचा स्क्रिनशॉटही अटॅच केला आहे. 'जो रिपोर्ट युजरने सब्मिट केला आहे, तो 30000 अमेरिकी डॉलर बाउंटीचा आहे.' असं त्या मेलमध्ये लिहिलेलं होतं. यापूर्वीही अदितीला इतर प्लॅटफॉर्म्सवर अशा त्रुटी शोधून दिल्याने बक्षिसं मिळाली आहेत.

(वाचा - महाराष्ट्रातल्या 21 वर्षीय विद्यार्थ्याने Instagram मध्ये सांगितली मोठी त्रुटी, Facebook ने दिले 22 लाख रुपये)

टेक्नोलॉजी कंपन्या बाउंटी प्रोग्रामचं आयोजन करत असतात. या बाउंटी प्रोग्राममध्ये एखाद्या युजरने, एखादी त्रुटीचा रिपोर्ट कंपनीला सब्मिट केल्यास आणि ती त्रुटी खरोखरचं असल्याचं कंपनीला आढळलं, तर त्या युजरला बक्षिस दिलं जातं. यालाच बाउंटी प्रोग्राम म्हणतात. याआधी महाराष्ट्रातील एका तरुणाने इन्स्टाग्राममध्ये (Instagram) काही त्रुटी शोधून दिल्यानंतर त्यालाही 22 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले होते.

First published:

Tags: Tech news