पॅनासॉनिकच्या एल्यूगा सीरिजचे 2 फोन लाँच

पॅनासॉनिकच्या एल्यूगा सीरिजचे 2 फोन लाँच

त्यातील पॅनेसॉनिक एल्यूगा ए3ची किंमत 11 हजार 290 रुपये आहे तर पॅनेसॉनिक एल्यूगा ए3प्रोची किंमत 12 हजार 290 रूपये आहे.

  • Share this:

स्नेहल पाटकर, प्रतिनिधी

11 ऑगस्ट: पॅनासॉनिकने एल्यूगा सीरिजचे दोन नवीन फोन भारतात लॉन्च केलेत. पॅनासॉनिक एल्यूगा ए3 आणि पॅनेसॉनिक ए3प्रो अशी या दोन नवीन मॉडेल्सची नावं आहेत. त्यातील पॅनेसॉनिक एल्यूगा ए3ची किंमत 11 हजार 290 रुपये आहे तर पॅनेसॉनिक एल्यूगा ए3प्रोची किंमत 12 हजार 290 रूपये आहे.

या नवीन मॉडेलचे फीचर्स जाणून घेऊ या.

- दोन्ही मोबाईलमध्ये मेटल बॉडी

-दोन्ही फोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी

-3 जीबी रॅम

-अॅड्राईड 7.0 नोगट

- 13 मेगापिक्सल रिअर तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

- 4जी व्हिओएलटीईला सपोर्ट

- ड्युअल सिम स्मार्टफोन

- कनेक्टिविटीसाठी वाय-फाय 802.11 बी/जी/एन

- ब्लूटूथ 4.0

- माइक्रो यूएसबी 2.0

- 5.2 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले

याशिवाय दोन्ही फोनमध्ये होम बटणमध्ये फिंगरप्रिंट सेंसर असेल. एल्यूगा ए3 आणि एल्यूगा ए3 प्रो मध्ये अँम्बियंट लाइट सेंसर, अॅक्सिलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि ओटीजी सुध्दा आहे. पॅनासॉनिक एल्यूगा ए3मध्ये 1.25 गीगाहर्टजचा क्वाड-कोर एमटी6737 प्रोसेसर दिला गेलाय. तर पॅनासॉनिक एल्यूगा ए3 प्रो मध्ये 1.3 गीगाहर्टजचा ऑक्टा-कोर एमटी6753 प्रोसेसर दिला गेलाय. एल्यूगा ए3 मध्ये 16 जीबी तर एल्यूगा ए 3 प्रो मध्ये 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज असेल. मात्र दोन्ही फोनचं स्टोरेज तुम्ही 128 जीबी पर्यंत वाढवू शकता.

हे दोन्ही फोन पॅनासोनिकच्या स्टोअर्ससोबतच इतर रिटेल आउटलेटमध्ये विकत घेता येतील.

First published: August 11, 2017, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading