Home /News /technology /

2 कोटी युजर्सला वापरता येणार WhatsApp Payment फीचर, अशी सेट करा पेमेंट सुविधा

2 कोटी युजर्सला वापरता येणार WhatsApp Payment फीचर, अशी सेट करा पेमेंट सुविधा

सध्या भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे 40 कोटींहून अधिक युजर्स आहेत. पण सध्या केवळ 2 कोटी नोंदणीकृत युजर्सला परवानगी दिली आहे. यासाठी कंपनीने विविध बँकांशी करार केला आहे.

  नवी दिल्ली, 22 डिसेंबर : फेसुबकने (Facebook) आपल्या व्हॉट्सअ‍ॅप ( WhatsApp) या चॅटिंग ॲपवर पेमेंट सुविधा सुरु केली आहे. यामुळे यापुढे व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसेही पाठवता येणार आहेत. या नवीन फीचरचा वापर 2 कोटी नोंदणीकृत युजर्स करू शकणार आहेत. सध्या भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे 40 कोटींहून अधिक युजर्स आहेत. पण सध्या केवळ 2 कोटी नोंदणीकृत युजर्सला परवानगी दिली आहे. एनपीसीआयने अलीकडेच थर्ड पार्टी यूपीआय व्यवहारांवर 30 टक्के कॅप लावली आहे. 1 जानेवारी 2021 पासून लागू होणार आहे. यासाठी कंपनीने विविध बँकांशी करार केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC BANK), आयसीआयसीआय (ICICI BANK) आणि अ‍ॅक्सिस बँक (AXIS BANK) या चार बँकांच्या मदतीने WhatsApp ने ही सुविधा सुरू केली आहे. WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांनी आमच्यासाठी या बँकांशी करार अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ग्राहक सुरक्षित पेमेंट करू शकणार आहेत. भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होण्यास यामुळे मदत होणार असून भारतातील 2 कोटी नोंदणीकृत युजर्सना यापुढे या फीचरचा लाभ घेता येणार आहे.

  (वाचा - अलर्ट! WhatsApp वर या मेसेजपासून सावधान; अन्यथा खाली होऊ शकतं बँक अकाउंट)

  नोव्हेंबर महिन्यात कंपनीने एनपीसीआयकडे यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर मागील महिन्यात यासाठी कंपनीला परवानगी देण्यात आली. भारतात सध्या मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट सिस्टीमचा वापर करण्यात येत आहे. 2023 पर्यंत भारतात याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असून मार्केट देखील वाढणार असल्याची शक्यता आहे. 2023 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत ही उलाढाल होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशी वापरा WhatsApp Payment सुविधा - - मोबाईलमध्ये WhatsApp सुरू करा. - पैसे पाठवू इच्छिणाऱ्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा - अटॅचमेंट बटनावर क्लिक करा - Accept आणि Continue करा

  (वाचा - भारतात Nokia चा Smart AC लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत आणि फीचर्स)

  - बँकेच्या यादीमधून तुमची बँक निवडा - बँक निवडल्यानंतर, आपलं खातं व्हेरीफाय केलं जाईल. तिथे Verify Via SMS पर्यायावर क्लिक करा. - SMS वर एक व्हेरिफिकेशन कोड येईल - ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर बँक खात व्हाट्सॲपशी जोडल्याचं दिसेल. - समोरील व्यक्तीला जितकी रक्कम पाठवायची आहे ती रक्कम टाका - यानंतर पेमेंट पूर्ण करण्यासाठी यूपीआय पीन (UPI PIN) टाकणं गरजेचं आहे. हे टाकल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Whatsapp

  पुढील बातम्या