नवी दिल्ली, 5 जानेवारी : Xiaomi चा नवा बहुचर्चित स्मार्टफोन आज भारतात लाँच झाला आहे. Mi 10i हा फोन Redmi Note 9 Pro 5G चं रीब्रँडेड व्हर्जन आहे. काही दिवसांपूर्वी शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन (Manu Kumar Jain) यांनी ट्विटद्वारे (Twitter) याची माहिती दिली होती. त्यानंतर आज अखेर भारतात हा फोन लाँच झाला आहे.
या फोनमध्ये सर्वात महत्त्वाचं फिचर म्हणजे याचा कॅमेरा आहे. Xiaomi Mi 10i फोनला 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर आहे. फोनला 6.67 इंची डिस्प्ले असू शकतो. त्याचबरोबर हा फोन पूर्णपणे भारतीय बनावटीचा असून संपूर्ण फोन भारतात तयार करण्यात आला आहे.
आज दुपारी 12 वाजता कंपनीच्या युट्यूब चॅनेलवर आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर कंपनीने हा फोन लाँच केला आहे. फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजसह आहे. 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड एँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनला 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. आता लाँचिंगनंतर या फोनला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mi 10i is here. Join us for the Livestream Starts at 12PM on 05.01.2021.#Mi10i #ThePerfect10 https://t.co/MUXode3Fvr
— Mi India #Mi10i is Here! (@XiaomiIndia) January 4, 2021
हा फोन मेड इन इंडिया असून भारतीय प्रोडक्ट टीमकडून बनवण्यात आला आहे. या फोनची किंमत ही 30 हजार रुपयांच्या आतमध्ये असल्याचं शाओमी ( Xiaomi) इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी म्हटलं आहे. या फोनमध्ये 4,820mAh बॅटरी असून याबरोबर 33W फास्ट चार्जर देखील आहे. याचबरोबर इतर महत्त्वाचे फिचर देखील लाँच झाल्यानंतर समोर येणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Xiaomi