S M L

शाओमीचा 'एमआई मॅक्स 2' झाला स्वस्त

4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत 16,999 इतकी झाली आहे.4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत 14,999 इतकी आहे.

Sonali Deshpande | Updated On: Oct 31, 2017 03:38 PM IST

शाओमीचा 'एमआई मॅक्स 2' झाला स्वस्त

31 आॅक्टोबर : शाओमीचा 'एमआई मॅक्स 2' हा नवीन स्मार्टफोन नुकताच लॉन्च झाला. पण आता कंपनीने या फोनची किंमत कमी केली आहे. शाओमीने या फोनला दोन प्रकारांमध्ये लॉन्च केलं आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत 16,999 इतकी झाली आहे.4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत 14,999 इतकी आहे.

या फोन वर 1000 रुपयांचा डिस्काउंट आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर हा फोन 15,999 आणि 13,999 मध्ये उपलब्ध आहे. दिवाळीत देखील शाओमीने या फोनवर अनेक ऑफर्स दिल्या होत्या.

हे आहेत 'एमआई मॅक्स 2' चे फिचर्स


- शाओमी एमआई मॅक्स 2 हा स्मार्टफोन मेटल बॉडी डिझाइनसह आहे.

- या फोनची 6.44 इंच मोठी स्क्रीन आहे. जी 1080 पिक्सेल रिझॉल्युशनसह आहे.

- हा फोन 'अँड्रॉइड नोगट'वर काम करतो.

Loading...

- हा फोन कंपनीच्या एमआईयूआई 8 वर आधारित आहे. जो लवकरच एमआययूआय 9 वर लवकरच अपडेट होणार आहे.

- या फोनमध्ये क्वालकॉम 'स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर' दिला आहे.

- चांगल्या क्षमतेसाठी फोनमध्ये v5,300 एमएएच बॅटरी दिले आहे. या कंपनीचा असा दावा आहे की एकदा फोन चार्ज केल्यानंतर हा फोन 57 तासांपर्यंत चालेल.

- फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. जो एफ/2.2 ऍपर्चर आणि फेस डिटेक्शन ऑटोफोकससह आहे.

- डुअल एलईडी फ्लॅश दिला गेला आहे.

- या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 02:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close