S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

शाओमी फ्लॅश सेलमध्ये 1 रुपयात मोबाईल, कधी आणि कुठे करणार खरेदी ?

या फ्लॅश सेलमध्ये फक्त 1 रुपयामध्ये आपण शाओमी रेडमी नोट 4 विकत घेऊ शकतो.

Sachin Salve | Updated On: Apr 5, 2017 09:56 PM IST

शाओमी फ्लॅश सेलमध्ये 1 रुपयात मोबाईल, कधी आणि कुठे करणार खरेदी ?

   

05 एप्रिल :  शाओमी 6 एप्रिलपासून त्यांच्या एमआय फॅन्स फेस्टिवलची सुरुवात करणार आहे. या फेस्टिवलमध्ये एमआय खूप कमी किंमतीमध्ये त्यांचे स्मार्टफोन्स, फिटनेस ब्रँड आणि अॅक्सेसिरिजची विक्री करणार आहे.  विशेष म्हणजे 1 रुपयामध्ये तुम्हाला रेडमी नोट 4 खरेदी करता येणार आहे.

1 रुपयात मोबाईलया फ्लॅश सेलमध्ये फक्त 1 रुपयामध्ये आपण रेडमी नोट 4 विकत घेऊ शकतो. परंतु यासाठी तुम्हाला एमआय अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. या फ्लॅश सेलची सुरुवात 6 एप्रिलला सकाळी 10 वाजेपासून होणार आहे. या ऑफरमध्ये 20 रेडमी नोट 4 ची विक्री करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त 2 वाजता सुरू होणाऱ्या सेलमध्ये 40 एमआय फिटनेस ब्रँड आणि 1000 mah च्या 50 पावरबँक सुद्धा 1 रुपयामध्ये विकले जाणार आहेत. शाओमीने अजूनपर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक रेडमी नोट 4 विकले आहेत. आणि कंपनीचा असा दावा आहे की, प्रत्येक 4 सेकंदामध्ये एमआय, 1 मोबाईल विकणार आहे.

   एमआय मॅक्स प्राइम वर 0% व्याजदर ऑफर

एक दिवस चालणाऱ्या या एमआय फॅन फेस्टिवलमध्ये, रेडमी 4A रोज गोल्ड आणि रेडमी नोट 4 5,999 रुपये आणि 9,999 रुपयांपर्यंत उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त रेडमी 3S प्राइम, एमआय मॅक्स प्राइम आणि एमआय 5 ची सुद्धा विक्री करणार आहे. जर तुम्ही  रेडमी 3S प्राइम खरेदी करणार आहात तर, तुम्हाला 100 रुपयांपर्यंत मोबाईल केस विकत घेऊ शकता, ज्याची ओरिजनल किंमत 349 रु. एवढी आहे. त्याच प्रमाणे एमआय मॅक्स प्राइमवर 0 टक्के व्याजदर उपलब्ध आहे.

 इतर प्रोडक्ट्सवर सुद्धा फॅन्स फेस्टिवल ऑफर

शाओमीचे दुसरे प्राॅडक्ट्स, म्हणजे प्युरीफायर, ईअरफोन्स, वीआर प्ले, एमआय ब्रँडवर सुद्धा 500 रुपयांपर्यंतची सूट आहे. एमआय एअर प्युरीफायर 2 आणि एअर प्युरीफायर फिल्टर 12.498 रुपये ऐवजी 10,998 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. या व्यतिरिक्त हॉलिडे किट ब्लूटूथ स्पीकर, सेल्फी स्टिक आणि हेडफोन 3,797 ऐवजी 3,497 रुपयांमध्ये मिळेल. त्याच सोबत फिटनेस बंडल, ज्यामध्ये एमआय ब्रँड 2 आणि एमआय कॅप्सुल ईअरफोन्स 2,998 रु. ऐवजी 2,598 रु. मध्ये मिळु शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 09:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close