जगभरात व्हाॅटस्अॅप तासाभरासाठी झालं होतं बंद, आता सेवा सुरळीत

जगभर सर्वात प्रिय असलेलं व्हाॅटस्अॅप तासाभरासाठी डाऊन झालं होतं. भारतात व्हाॅटस्अॅप युजर्स कुणाला मेसेज पाठवू शकत नव्हते की मेसेज रिसिव्ह करू शकत होते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2017 04:16 PM IST

जगभरात व्हाॅटस्अॅप तासाभरासाठी झालं होतं बंद, आता सेवा सुरळीत

03 नोव्हेंबर : जगभर सर्वात प्रिय असलेलं व्हाॅटस्अॅप तासाभरासाठी डाऊन झालं होतं. भारतात व्हाॅटस्अॅप युजर्स कुणाला मेसेज पाठवू शकत नव्हते की मेसेज रिसिव्ह करू शकत होते. भारताप्रमाणे ब्रिटन, अमेरिकेतही व्हाॅटस्अप बंद पडलं होतं. ही सेवा डाऊन झाल्यावर ट्विटरवर टाॅप ट्रेंडिग टाॅपिक झाला होता. #whatsappdown अशी तक्रार सुरू होती.

Loading...

एका ट्विटर युजरनं लिहिलंय, 'पहिल्यांदा आम्ही whatsapp सुरू केला. त्यानंतर तो का डाऊन आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही ट्विटरची मदत घेतली.'

क्रिकेटर रवींद्र जडेजानंही whatsapp बंद झाल्याचं ट्विट केलं.

एका वेबसाईटच्या माहितीप्रमाणे, 46 टक्के युजर्सनी कनेक्शनसंबंधी तक्रारी केल्या. 41 टक्के युजर्सनी मेसेज येत नाहीत आणि जात नाहीत असं सांगितलं. 12 टक्क्यांना लास्ट सीनची समस्या जाणवली. सप्टेंबरच्या सुरुवातीलाही व्हाॅटसअप थोड्या वेळ बंद पडलं होतं. तर मेमध्येही मलेशिया, स्पेन, युरोपमध्येही काही तास व्हाॅटसअप बंद पडलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...